23 November 2024 3:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Bondada Engineering Share Price | रॉकेट वेगात परतावा देतोय हा शेअर, मागील 3 दिवसात दिला 33% परतावा, रोज अप्पर सर्किट

Bondada Engineering Share Price

Bondada Engineering Share Price | सध्या जर तुम्ही गुंतवणुकीसाठी मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल तर, रुखी बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकता. मागील तीन ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 33 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्के अप्पर सर्किटसह 366.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 791 कोटी रुपये आहे. आज सोमवार दिनांक 6 नोव्हेंबर 2023 रोजी बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 384.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, या कंपनीला तीन कंपन्यांनी 406.64 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर्स दिल्या आहेत. बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीला 406.64 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, भारत संचार निगम लिमिटेड आणि भारती एअरटेल या तीन कंपन्यांनी दिल्या आहेत. बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीला भारती एअरटेल कंपनी ने 1.37 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे.

मागील एका महिन्यात बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 106 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 145 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही सहा महिन्यांपूर्वी या कंपनीच्या स्टॉकमध्ये एक लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.44 लाख रुपये झाले असते.

बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीला 405.27 कोटी रुपये मूल्याच्या 2 ऑर्डर मिळाल्या आहेत, ज्यामध्ये भारत संचार निगम लिमिटेड कंपनीने 381 कोटी रुपऐवजी आणि दुसरी ऑर्डर 24.27 कोटी रुपये मूल्याची BHEL कंपनीने दिली आहे. या ऑर्डर अंतर्गत बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीला 2 मेगावॅट क्षमतेचा सौर पीव्ही प्रकल्प ‘बांधा, स्वतः चालवा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर उभारायचा आहे.

बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 च्या सप्टेंबर 2023 तिमाहीत 10.92 टक्क्यांचा वाढीसह 370.59 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी कंपनीने 334.11 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तसेच कंपनीचा निव्वळ नफा 10.14 कोटी रुपयेवरून वाढून 17.85 कोटी रुपयेवर पोहचला आहे. बोंदाडा इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनी मुख्यतः दूरसंचार, सौर ऊर्जा आणि पायाभूत सुविधा प्रदान करणाऱ्या कंपन्यांना अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम, ऑपरेशन आणि मेंटेनन्स सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bondada Engineering Share Price NSE 06 November 2023.

हॅशटॅग्स

Bondada Engineering Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x