19 April 2025 8:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Reliance Capital Share Price | हे काय? 11 रुपयाचा रिलायन्स कॅपिटल शेअर पुन्हा तेजीत, रोज अप्पर सर्किट हीट, खरेदी का वाढली?

Reliance Capital Share Price

Reliance Capital Share Price | कर्जबाजारी उद्योगपती अनिल अंबानीं यांच्या रिलायन्स कॅपिटल कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा शेअर बाजारात ट्रेड करु लागले आहेत. नुकताच या कंपनीने दिवाळखोरीच्या प्रक्रियेला तोंड दिले आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई इंडेक्सवर रिलायन्स कॅपिटल स्टॉक 10.33 रुपये किमतीवर पोहचला होता.

आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागला आहे. आज मंगळवार दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी रिलायन्स कॅपिटल स्टॉक 4.69 टक्के वाढीसह 11.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक परळी किंमत 12.39 रुपये होती. दरम्यान रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या कर्जदारांच्या समितीची 54 वीं बैठक 3 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या प्रशासकाने समितीला विक्री प्रक्रियेची स्थितीची अपडेट कळवली होती.

भारतातील प्रसिद्ध हिंदुजा ग्रुपने रिलायन्स कॅपिटल कंपनी खरेदी केली आहे. नोव्हेंबर 2023 अखेर रिलायन्स कॅपिटल कंपनीची मालकी हिंदुजा समूहाकडे हस्तांतरित करण्यात येईल अशी माहिती कंपनीने दिली आहे. हिंदुजा ग्रुप कंपनीजचे अध्यक्ष अशोक पी.हिंदुजा यांनी माहिती दिली की, रिलायन्स कॅपिटल कंपनीची हस्तांतरण प्रक्रिया एका कायदेशीर पेच प्रसंगातअडकली आहे.

हिंदुजा ग्रुप कंपनीच्या मालकीची Indusind International Holdings Limited या कंपनीने रिलायन्स कॅपिटलसाठी सर्वात मोठी बोली लावली होती. याप विरोधात टोरेंट इन्व्हेस्टमेंट्स कंपनीने आक्षेप घेतला आणि न्यायालयात केस दाखल केली. वास्तविक लिलावाच्या दुसऱ्या फेरीत टोरेंट कंपनी बाहेर पडली होती.

मागील 5 वर्षात रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या शेअर्सची किंमत 99 टक्क्यांनी घसरली आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीचे शेअर 270 रुपयेवरून घसरून 10 रुपयेच्या खाली आले होते. 2008 मध्ये रिलायन्स कॅपिटल कंपनीचे शेअर्स 2770 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Capital Share Price NSE 07 November 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Reliance Capital Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या