22 November 2024 12:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

Inox Share Price | आयनॉक्स विंड शेअर गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून देतोय, अल्पावधीत दिला 64 टक्के परतावा

Inox Share Price

Inox Share Price | आयनॉक्स विंड या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 11 टक्क्यांच्या वाढीसह 240 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर 215 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी एका सकारात्मक बातमीमुळे पाहायला मिळत आहे. आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 89.60 रुपये होती. तर आज मंगळवार दिनांक 7 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.58 टक्के वाढीसह 239.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

आयनॉक्स विंड या पवन उर्जा सोल्यूशन्स प्रदान करणाऱ्या कंपनीने सोमवारी एका निवेदनात माहिती दिली की, एनटीपीसी रिन्युएबल एनर्जी लिमिटेड कंपनीने दयापर, भुज, गुजरात या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या 150 मेगावॅट वीज प्रकल्पा अंतर्गत दयापर विंड ऊर्जा प्रकल्प फेज-I च्या 50 मेगावॅट क्षमतेचे काम यशस्वीपणे पूर्ण केले आहे. आयनॉक्स विंड कंपनीने या प्रकल्पासाठी 113 मीटर रोटर व्यास आणि 92 मीटर हब उंचीच्या विंटर्बाइन जनरेटरचा पुरवठा केला होता.

आयनॉक्स ग्रीन एनर्जी कंपनी या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत ऑपरेशन्स आणि देखभाल सेवा प्रदान करण्याचे काम करणार आहे. आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस या आयनॉक्स विंडच्या उपकंपनीला या प्रकल्पाचे 25 वर्षांसाठीचे ऑपरेशन्स आणि देखभाल करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

आयनॉक्स कंपनीने माहिती दिली की, एनटीपीसी रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड कंपनीने सुरू केलेला हा पहिला प्रकल्प आहे. हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर दयापूर विंड कॉम्प्लेक्समधील एनटीपीसी कंपनीच्या विद्यमान 100 मेगावॅट पवन ऊर्जा पोर्टफोलिओमध्ये 450 मेगावॅट क्षमतेची वाढ करेल. 2023 या वर्षात आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 120 टक्के परतावा कमावून दिला आहे.

2 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 109 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 6 नोव्हेंबर 2023 रोजी आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअर्सने 240 रुपये किंमत स्पर्श केली होती. मागील 6 महिन्यांत आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 109 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्के नफा मिळवून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Inox Share Price NSE 07 November 2023.

हॅशटॅग्स

Inox Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x