23 November 2024 12:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

SAR Televenture Share Price | याला म्हणतात नशीब! गुंतवणूकदारांचे पैसे पहिल्याच दिवशी दुप्पट झाले, एसएआर टेलिव्हेंचर IPO स्टॉकची कमाल

SAR Televenture Share Price

SAR Televenture Share Price | एसएआर टेलिव्हेंचर या दूरसंचार सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीसह सूचीबद्ध झाले आहेत. एसएआर टेलिव्हेंचर कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर ची किंमत बँड 52-55 रुपये जाहीर केली होती. या कंपनीचे शेअर्स 55 रुपये अप्पर प्राइस बँडवर वाटप करण्यात आले आहेत.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये SAR टेलिव्हेंचर कंपनीचे शेअर्स 105 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. आज गुरूवार दिनांक 9 नोव्हेंबर 2023 रोजी एसएआर टेलिव्हेंचर स्टॉक 4.98 टक्के घसरणीसह 104.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एसएआर टेलिव्हेंचर कंपनीचे शेअर्स IPO किमतीच्या तुलनेत 91 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. SAR टेलिव्हेंचर कंपनीचे शेअर्स NSE SME एक्सचेंजवर सूचीबद्ध करण्यात आले आहेत. या कंपनीचे शेअर्स लिस्टिंग झाल्यानंतर लगेचच 5 टक्के अप्पर सर्किटसह 110.25 रुपये किमतीवर पोहोचले होते. ज्या गुंतवणूकदारांनी या आयपीओमध्ये पैसे लावले होते, त्यांचे पैसे पहिल्याच दिवशी दुप्पट झाले आहेत.

किरकोळ गुंतवणूकदारांना या IPO मध्ये एक लॉट खरेदी करण्याची मुभा होती. कंपनीने एका लॉटमध्ये 2000 शेअर्स ठेवले होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी 110,000 रुपये जमा करावे लागले होते. या कंपनीच्या IPO चा आकार 24.75 कोटी रुपये होता.

एसएआर टेलिव्हेंचर कंपनी IPO मधून जमा केलेली रक्कम 4G/5G टॉवर्स उभारण्यासाठी आणि खेळत्या भांडवलाची गरज भागवण्यासाठी खर्च करणार आहे. या कंपनीचा IPO एकूण 288 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 222.10 पट अधिक सबस्क्राइब झाला होता.

गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 715.77 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा राखीव कोटा 77 पट सबस्क्राईब झाला होता. एसएआर टेलिव्हेंचर IPO 1 नोव्हेंबर 2023 तर 3 नोव्हेंबर 2023 पर्यंत गुंतवणूकीसाठी खुला करण्यात आला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SAR Televenture Share Price NSE 09 November 2023.

हॅशटॅग्स

SAR Televenture Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x