18 November 2024 4:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO
x

Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा पॉवर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर्सवर काय परिणाम होणार? फायदा घेणार?

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीने नुकताच आपले सप्टेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहे. या तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 9 टक्के वाढीसह 1,017.41 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. उत्पन्नात वाढ झाल्यामुळे कंपनीच्या नफ्यात मजबूत वाढ पाहायला मिळाली आहे. 2022-23 मध्ये याच तिमाहीत टाटा पॉवर कंपनीने 935.18 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

टाटा पॉवर कंपनीने सप्टेंबर 2023 तिमाहीत 16,029.54 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी कंपनीने 14,181.07 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आज गुरूवार दिनांक 9 नोव्हेंबर 2023 रोजी टाटा पॉवर स्टॉक 2.14 टक्के घसरणीसह 249.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टाटाच्या पॉवर कंपनीने आपले जाहीर निवेदनात माहिती दिली आहे की, कंपनीच्या मुख्य व्यवसायाने या तिमाहीत निव्वळ नफ्यात 84 टक्के योगदान दिले आहे. टाटा पॉवर कंपनीचे कोळसा खाणकामांसह परकीय संयुक्त उपक्रमांचे योगदान कमी होत आहे.

टाटा पॉवरच्या सीईओनी माहिती दिली की, “टाटा पॉवर कंपनीने आपल्या आर्थिक कामगिरीत मजबूत वाढ नोंदवली आहे. कंपनीच्या सर्व मुख्य व्यवसायांच्या अप्रतिम योगदानामुळे टाटा पॉवर कंपनीने सप्टेंबर तिमाहीत उत्कृष्ठ आर्थिक कामगिरी केली आहे”.

टाटा पॉवर कंपनीची आर्थिक क्षमता, व्यवसायाची ताकद आणि उत्तम ऑपरेशन्स आणि वैविध्य यामुळे कंपनीने आपल्या निव्वळ नफ्यात चांगली कामगिरी केली आहे. टाटा पॉवर कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर करताच कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांनी वाढले होते. आज मते टाटा पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 22 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price NSE 09 November 2023.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(129)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x