23 November 2024 10:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Yes Bank Share Price | 18 रुपयाचा येस बँक शेअर मजबूत तेजीत, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईस जाहीर केली, पुढे फायदा की तोटा?

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | मागील काही दिवसांपासून येस बँकेच्या शेअर्समध्ये कमालीची खरेदी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 4.45 टक्क्यांच्या वाढीसह 18.77 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील आठ ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 18 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर 2023 या वर्षात येस बँक स्टॉक 15 टक्के घसरला आहे.

एंजेल वन फर्मच्या तज्ञांच्या मते, येस बँकेचे शेअर्स मागील बऱ्याच महिन्यापासून 15.20 रुपये तर 18.50 रुपये दरम्यान ट्रेड करत आहेत. अशा मंदीच्या काळात तज्ञांनी या स्टॉकमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी येस बँक स्टॉक 1.09 टक्के वाढीसह 18.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, येस बँकेचे शेअर्स काही प्रमाणात वाढले आहेत. आणि पुढील काही आठवड्यात या बँकेचे शेअर्स 21-22 रुपये किंमत पातळी स्पर्श करू शकतात. तज्ञांच्या मते, येस बँकेच्या गुंतवणूकदारांनी सध्याच्या या किंमत पातळीवर नफा बुक करणे, फायद्याचे राहील. डीआरएस फिनव्हेस्ट फर्मचे तज्ञ म्हणाले की, येस बँकेचे शेअर्स पुढील काळात 20 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आणि या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना तज्ञांनी 17 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

नुकताच येस बँकेने मालमत्ता पुनर्रचना कंपनी जेसी फ्लॉवर्स एआरसी कंपनीमध्ये गुंतवणूक करून आपला हिस्सा 9.9 टक्क्यांवर नेला आहे. 27 ऑक्टोबर 2023 रोजी जेसी फ्लॉवर्स कंपनीने 2.4 कोटी शेअर्स येस बँकेला हस्तांतरित केले आहेt.

आता येस बँकेचा या कंपनीतील वाटा 9.9 टक्क्यांवर पोहोचला आहे. येस बँकेने मागील वर्षी 28 नोव्हेंबर 2022 रोजी जेसी फ्लॉवर्स कंपनीचे 9.9 टक्के भाग भांडवल खरेदी केले होते. नंतर हे प्रमाण 5.01 टक्क्यांवर आले. आता पुन्हा येस बँकेने अतिरिक्त शेअर्स खरेदी करून आपली हिस्सेदारी पूर्वीच्या पातळीवर नेली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE 10 November 2023.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(195)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x