Senior Citizen Saving Scheme | छोट्या गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, अल्पबचत योजनांच्या नियमांमध्ये बदल, फायदा की नुकसान?

Senior Citizen Saving Scheme | अल्पबचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) यासह विविध अल्पबचत योजनांसाठी सरकारने नियम शिथिल केले आहेत. नव्या नियमानुसार ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी ३ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे, तर सध्या हा कालावधी एक महिन्याचा आहे.
एससीएससी (SCSC) खाते 3 महिन्यांच्या आत उघडता येईल
गॅझेट नोटिफिकेशननुसार, निवृत्तीचा लाभ मिळाल्यापासून 3 महिन्यांच्या आत एखादी व्यक्ती ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत (SCSS) खाते उघडू शकते. ही अधिसूचना ९ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आली होती. मुदतपूर्तीच्या तारखेला किंवा वाढीव मुदतपूर्तीच्या तारखेला योजनेसाठी निश्चित दराने व्याजदर उपलब्ध होईल, असे अधिसूचनेत म्हटले आहे.
पीपीएफ नियमांमध्ये बदल
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) च्या बाबतीत मुदतपूर्व खाती बंद करण्याबाबत काही बदल करण्यात आले आहेत. या योजनेला पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (दुरुस्ती) योजना, 2023 असे नाव दिले जाऊ शकते, असे अधिसूचनेत म्हटले आहे.
‘या’ योजनेतून पैसे काढण्याच्या नियमात बदल
याशिवाय राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजनेअंतर्गत मुदतपूर्व पैसे काढण्याच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. खाते उघडल्याच्या तारखेपासून 4 वर्षांनंतर 5 वर्षांच्या कालावधीच्या खात्यातील ठेवी अकाली काढल्यास पोस्ट ऑफिस बचत खात्यावर लागू असलेल्या दराने व्याज देय असेल.
सध्याच्या नियमानुसार तीन वर्षांच्या मुदत ठेवीवर ग्राह्य दराने व्याज दिले जाते. लघुबचत योजनांचे व्यवस्थापन अर्थ मंत्रालयांतर्गत आर्थिक व्यवहार विभागामार्फत केले जाते.
सध्या सरकार रिकरिंग डिपॉझिट (RD), पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF), सुकन्या समृद्धी योजना (SSY), महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (Mahila Samman Saving Certificate), किसान विकास पत्र (KVP), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) यासह 9 प्रकारच्या अल्प बचत योजना प्रदान करते.
Disclaimer : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Senior Citizen Saving Scheme Rules check details 11 November 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID