26 November 2024 3:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

देशात राहुल गांधींची हवा, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नाटकचे, DK शिवकुमार लिंगायत समाजाचे, लोकसभेत भाजपाला सुपडा साफ होण्याची भीती

Karnataka BJP Crisis

Karnataka BJP | कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपला लोकसभा निवडणुकीत नुकसान सोसायचे नाही. लिंगायत मतांना आकर्षित करण्यासाठी आणि डीके शिवकुमार यांचा गळा कापण्यासाठी भाजपने राज्यातील पक्षाची जबाबदारी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांच्याकडे सोपवली आहे. येत्या १५ सप्टेंबररोजी कर्नाटक प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची पहिली सभा होणार आहे. यानिमित्ताने बेंगळुरू पॅलेस येथे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. भाजपच्या कर्नाटकातील बिकट स्थितीने त्यांना पुन्हा घराणेशाहीवर स्वार होण्यास भाग पाडलं आहे.

भाजपची सूत्रे हाती घेण्यापूर्वी विजयेंद्र यांनी वोक्कालिगा आणि लिंगायतांच्या मठांना भेट दिली. कर्नाटकात हे दोन्ही समाज मुबलक प्रमाणात आहेत. या निर्णयाचा फायदा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत होईल, अशी भाजपला आशा आहे. यामुळे दोन्ही समाजावरील आपली पकड मजबूत होईल. विधानसभा निवडणुकीत 104 वरून 66 जागांवर खाली येण्याचे कारण म्हणजे बीएस येडियुरप्पा यांना दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यात आले होते, असेही अनेकांचे म्हणणे आहे. त्याचवेळी डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री केले जाऊ शकते या आशेने वोकलिंग समाजाने काँग्रेसला मतदान केले.

कर्नाटकात काँग्रेस अत्यंत मजबूत स्थितीत
कर्नाटकात काँग्रेस अत्यंत मजबूत स्थितीत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष हे कर्नाटकचे असून ते बहुजन नेते देखील आहेत. तसेच देशात राहुल गांधी यांची देखील हवा निर्माण झाली आहे हे भाजपचे नेते ऑफस्क्रीन बोलू लागले आहेत. तसेच उपमुख्यमंत्री डिके शिवकुमार हे स्वतः लिंगायत समाजाचे आहेत. तसेच राज्यात आता काँग्रेसची सत्ता असल्याने लोकसभा निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ होण्याची धास्ती भाजपाला आहे.

निवडणुकीपूर्वी जेडीएसशी झालेली युती आणि येडियुरप्पा यांच्या मुलाची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती ही दोन्ही पावले भाजपला मोठ्या आशा निर्माण करणारी आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 25 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेस आणि जेडीएसला प्रत्येकी एक जागा जिंकता आली. लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा करण्यासाठी लवकरच दिल्लीत जाऊन बैठक घेणार असल्याचे विजयेंद्र यांनी रविवारी तुमकुरू येथे माध्यमांशी बोलताना सांगितले. त्याचबरोबर कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याचीही निवड होणार आहे. विरोधी पक्षाचा नेता कोण असेल हे दिल्लीतच ठरवायचे आहे.

विरोधी पक्षनेत्याची मिळू शकते जबाबदारी
विजयेंद्र यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. त्यांच्या येण्याने बसवराज बोम्मई आणि बसनगौडा पाटील यतनाल यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तर त्यासाठी वोक्कालिगा किंवा ओबीसी नेत्याची निवड होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. माजी डेप्युटी सीएम आर अशोक आणि सीएन अश्वथ नारायण हे दोघेही वोक्कालिगा आहेत. ओबीसींमध्ये माजी मंत्री सुनीलकुमार करकला आणि कोटा श्रीनिवास पुजारी यांची नावे आहेत.

News Title : Karnataka BJP Crisis before Lok Sabha Election 2024 13 November 2023.

हॅशटॅग्स

#Karnataka BJP Crisis(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x