23 November 2024 6:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Yes Bank Share Price | एका आठवड्यात 13% परतावा देणाऱ्या येस बँक शेअरने आजही 4.89% परतावा दिला, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. सध्या या कंपनीचे शेअर्स 15-25 रुपये किमतीच्या दरम्यान ट्रेड करत आहे. आज देखील शेअरमधे तेजी पाहून गुंतवणूकदारांना सुखद धक्का बसला आहे. तज्ञांच्या मते जर येस बँक स्टॉक 20 रुपयेच्या वर गेला, तर या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात नफा वसुली पाहायला मिळू शकते.

मागील एका आठवड्यात येस बँक स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 13 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील तीन महिन्यांत येस बँकेचे शेअर्स 10 टक्के आणि मागील एका वर्षात या बँकेचे शेअर्स 10 टक्के वाढले आहेत. दिनांक 13 नोव्हेंबर 2023 रोजी येस बँकेचे शेअर्स 4.89 टक्के वाढीसह 19.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

येस बँकेने नुकताच आपले सप्टेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. येस बँकेने मागील वर्षीच्या सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीत निव्वळ नफ्यात 50 टक्के वाढ नोंदवली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या ऑपरेटिंग नफ्यात फारशी वाढ झाली नाही. या तिमाहीत येस बँकेच्या महसूल उत्पन्नात 8 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तर, येस बँकेचे व्याज उत्पन्न मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 3 टक्के कमी झाले आहे.

येस बँकेचा निव्वळ व्याज मार्जिन दुसर्‍या तिमाहीत 30 बेस पॉइंट्सच्या घसरणीसह 2.3 टक्के नोंदवला गेला आहे. तर 30 सप्टेंबर 2023 पर्यंत येस बँकेचा ग्रॉस NPA 2 टक्के नोंदवला गेला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत येस बँकेच्या ग्रॉस NPA मध्ये फारसा बदल झालेला नाही.

मागील वर्षी याच तिमाहीत येस बँकेचा NPA 12.9 टक्के नोंदवला गेला होता. या वर्षी सप्टेंबर तिमाहीत येस बँकेचा नेट NPA 0.9 टक्के नोंदवला आहे. तर मागील वर्षी या बँकेचा नेट NPA 3.6 टक्के नोंदवला गेला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE 13 November 2023.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(195)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x