16 April 2025 6:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN
x

Power Mech Share Price | काय पॉवर आहे शेअरमध्ये! 3 वर्षात या शेअरने पैसे 10 पट वाढवले, पॉवर मॅक प्रोजेक्ट्स शेअरबद्दल जाणून घ्या

Power Mech Share Price

Power Mech Share Price | पॉवर मॅक प्रोजेक्ट्स कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. नागरी बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या पॉवर मॅक प्रोजेक्ट्स कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत.

मागील वर्षीच्या तुलनेत पॉवर मॅक प्रोजेक्ट्स कंपनीने आपल्या नफ्यात 20 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. कंपनीच्या महसूल संकलनात देखील 21 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. आज सोमवार दिनांक 13 नोव्हेंबर 2023 रोजी पॉवर मॅक प्रोजेक्ट्स स्टॉक 1.02 टक्के वाढीसह 3,965.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सप्टेंबर 2023 तिमाहीत पॉवर मॅक प्रोजेक्ट्स कंपनीचा निव्वळ नफा 20.1 टक्क्यांच्या वाढीसह वाढून 51.3 कोटीवर पोहोचला आहे. मागील वर्षी या कंपनीने 42.7 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. पॉवर मॅक प्रोजेक्ट्स कंपनीने सप्टेंबर तिमाहीत 20.9 टक्क्यांच्या वाढीसह 932.4 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 771.4 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या तिमाहीत कंपनीचा EBITDA 30.8 टक्क्यांच्या वाढीसह 113.3 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील तिमाहीत पॉवर मॅक प्रोजेक्ट्स कंपनीने 12.2 टक्के मार्जिन साध्य केले होते, जे गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत 11.2 टक्के नोंदवले गेले होते.

मागील 3 महिन्यांत पॉवर मॅक प्रोजेक्ट्स कंपनीच्या शेअरची किंमत 6 टक्क्यांनी खाली आली आहे. 2023 या वर्षात पॉवर मॅक प्रोजेक्ट्स कंपनीचे शेअर्स 93 टक्के वाढले आहे. मागील एका वर्षात पॉवर मॅक प्रोजेक्ट्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 111 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 10 पट वाढवले आहेत. पॉवर मॅक प्रोजेक्ट्स ही हैदराबाद स्थित कंपनी पायाभूत बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करते.

या कंपनीच्या अनेक उपकंपन्या मध्य पूर्व आणि आफ्रिकन देशांमध्ये व्यवसाय करतात. पॉवर मॅक प्रोजेक्ट्स ही कंपनी ऊर्जा क्षेत्रात देखील व्यवसाय करते, आणि या कंपनीने अनेक अल्ट्रा मेगा पॉवर प्रकल्प, सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर प्रकल्प, गॅस टर्बाइन जनरेटर, हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पांशी संबंधित काम केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Power Mech Share Price NSE 13 November 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Power Mech Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या