22 November 2024 1:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

ROX Hi-Tech IPO | लॉटरी लागणार! पहिल्याच दिवशी गुंतवणुकदारांना मिळणार 120 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा, GMP ने आनंदी-आनंद

ROX Hi-Tech IPO

ROX Hi-Tech IPO | आरओएक्स हाय-टेक कंपनीचा IPO अवघ्या 3 दिवसात 291 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. ग्रे मार्केटमध्ये देखील या कंपनीचे शेअर्स जबरदस्त कामगिरी करत आहेत. आरओएक्स हाय-टेक कंपनीचा स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्या दिवशी गुंतवणूकदारांना मोठा नफा देण्याची शक्यता आहे. या कंपनीचा IPO 7 नोव्हेंबर 2023 ते 9 नोव्हेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.

ज्या गुंतवणूकदारांनी आरओएक्स हाय-टेक कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे लावले होते, ते लोक आता या शेअर्सच्या लिस्टिंगची आतुरतेने वाट पाहत आहेत. आरओएक्स हाय-टेक कंपनीचे IPO शेअर्स 15 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर धारकांना वाटप केले जातील. तज्ञांच्या मते ज्या लोकांनी या IPO मध्ये पैसे लावले आहेत, त्यांना प्रत्येक शेअरवर 100 रुपये नफा मिळू शकतो.

ब्रोकरेज फर्मच्या अहवालानुसार, आरओएक्स हाय-टेक कंपनीचा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 100 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. जर हा ट्रेंड स्टॉक लिस्टिंग होईपर्यंत असाच सुरू राहिला, आरओएक्स हाय-टेक स्टॉक 183 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. आरओएक्स हाय-टेक IPO स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणुकदारांना 120 टक्क्यांपेक्षा जास्त नफा देऊ शकतो.

आरओएक्स हाय-टेक कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची प्राइस बँड 80 ते 83 रुपये निश्चित केली होती. या कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 1600 शेअर्स ठेवले होते. गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 132800 रुपये जमा करावे लागले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | ROX Hi-Tech IPO GMP today 14 November 2023.

हॅशटॅग्स

ROX Hi-Tech IPO(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x