23 November 2024 1:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

JP Associates Share Price | 20 रुपयाच्या जेपी असोसिएट्स शेअरने एका महिन्यात दिला 64% परतावा, आता अजून मोठी बातमी आली

JP Associates Share Price

JP Associates Share Price | जेपी ग्रुपचा भाग असलेल्या जयप्रकाश असोसिएट्स कंपनीच्या शेअरबाबत मोठी अपडेट आली आहे. जेपी असोसिएट्स कंपनीने ICICI बँकेसोबत एक करार केला आहे. या कराराअंतर्गत जेपी असोसिएट्स कंपनीने 18.9 कोटी शेअर्स ICICI बँकेला हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे. सेबी फाइलिंगमध्ये कंपनीने माहिती दिली आहे की, जेपी असोसिएट्स (JP Associates Share) कंपनीने केलेला करार कर्ज कमी करण्याच्या उद्देशाने केला आहे.

मागील एका महिन्यात जेपी असोसिएट्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 64 टक्के वाढवले आहे. 16 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 11.81 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गुरूवार दिनांक 16 नोव्हेंबर 2023 रोजी जयप्रकाश असोसिएट्स स्टॉक 3.23 टक्के वाढीसह 20.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड कंपनीने आपले कर्ज कमी करण्यासाठी 18.93 कोटी शेअर्स ICICI बँकेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी आपल्या कर्जाची पुर्तता करण्यासाठी आपले शेअर्स बँकेकडे सुरक्षा म्हणून हस्तांतरित करणार आहे. या कंपनीने 14 नोव्हेंबर 2023 रोजी सेबी फाइलिंगमध्ये कळवले की, हस्तांतरित केल्या जाणाऱ्या शेअर्सचे मूल्य पूर्वीच्या ट्रेडिंग सेशनमधील क्लोजिग किंमतीवर आधारित असणार आहे.

13 नोव्हेंबर 2023 रोजी जेपी असोसिएट्स कंपनीचे शेअर्स 19.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत जेपी ग्रुप कंपनीचा भाग असलेल्या जयप्रकाश असोसिएट्स कंपनीने 177 टक्के परतावा कमावून दिला आहे. 19 में 2023 रोजी जयप्रकाश असोसिएट्स कंपनीचे शेअर्स 6.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 13 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.35 रुपये किमतीवर पोहोचले होते.

मागील 8 महिन्यांत जेपी असोसिएट्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 190 टक्के परतावा कमावून दिला आहे. जयप्रकाश असोसिएट्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 20.16 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 6.56 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | JP Associates Share Price NSE 16 November 2023.

हॅशटॅग्स

JP Associates Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x