ROX Hi Tech IPO | लॉटरी लागली! रॉक्स हायटेक IPO शेअरने पहिल्याच दिवशी 62 टक्के परतावा दिला, डिटेल्स जाणून घ्या
ROX Hi Tech IPO | रॉक्स हायटेक या IT सोल्युशन्स सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिला आहे. या कंपनीच्या IPO ला 214 पट अधिक बोली प्राप्त झाली आहे. रॉक्स हायटेक कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 80-83 रुपये दरम्यान निश्चित केली होती. आज या कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीसह शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत.
रॉक्स हायटेक IPO स्टॉकने ग्रे मार्केटमध्ये देखील जबरदस्त कामगिरी केली आहे. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, रॉक्स हायटेक कंपनीचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 120 टक्के प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 16 नोव्हेंबर 2023 रोजी रॉक्स हायटेक कंपनीचे शेअर्स 135 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत.
ग्रे मार्केट तज्ञांच्या मते, रॉक्स हायटेक कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 100 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीचे शेअर्स 62.65 टक्के वाढीसह शेअर्स बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. स्टॉक लिस्टिंगनंतर काही वेळातच शेअर 5 टक्के अप्पर सर्किटसह 141.75 रुपये किमतीवर पोहचला. म्हणजेच, गुंतवणूकदारांना स्टॉक लिस्टिंगच्या पहील्याच दिवशी 120 टक्केपेक्षा जास्त नफा मिळाला. रॉक्स हायटेक कंपनीचा IPO एकूण 214 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.
रॉक्स हायटेक कंपनीने आपल्या IPO अंतर्गत 60.18 लाख फ्रेश शेअर्स आणि 5.47 लाख शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्रीसाठी खुले केले होते. IPO पूर्वी कंपनीच्या प्रवर्तकांनी एकूण 83.29 टक्के भाग भांडवल धारण केले होते. या कंपनीच्या प्रवर्तक गटात जिम राकेश आणि सुकन्या राकेश हे सामील आहेत.
रॉक्स हायटेक कंपनीच्या IPO मधील किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 204.02 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. या कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील. या कंपनीच्या IPO चा आकार 54.49 कोटी रुपये आहे. गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 366.86 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. तर क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा राखीव कोटा एकूण 106.25 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.
या कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 1600 शेअर्स ठेवले होते. एक लॉट खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांना 132800 रुपये जमा करावे लागले होते. या कंपनीचा IPO 7 नोव्हेंबर 2023 ते 9 नोव्हेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | ROX Hi Tech IPO GMP 16 November 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल