25 November 2024 7:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Sprayking Agro Share Price | 25 रुपयाच्या शेअरने 10 महिन्यात दिला 804 टक्के परतावा, हा मल्टिबॅगर शेअर खरेदी करणार?

Sprayking Agro Share Price

Sprayking Agro Share Price | स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.5 टक्क्यांच्या वाढीसह 226.5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 239 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांच्या नीचांक पातळी किंमत 22.80 रुपये होती.

या किमतीवरून हा स्टॉक तब्बल 900 टक्के वाढला आहे. आज शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.45 टक्के वाढीसह 231.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 5 दिवसात स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंट लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 14 टक्क्यांनी वाढली आहे. तर मागील 6 महिन्यांत स्प्रे किंग अॅग्रो इक्विपमेंट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 106 टक्के परतावा कमावून दिला आहे. 11 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक आता 804 टक्के वाढला आहे.

15 नोव्हेंबर 2022 रोजी स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 22.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून शेअरची किंमत आतपर्यंत 900 टक्के वाढली आहे. 27 मार्च 2020 रोजी स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8 रुपये या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते.

नुकतेच कस्टम अबकारी आणि सेवा कर अपीलीय न्यायाधिकरणाने स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट लिमिटेड कंपनीच्या बाजूने निर्णय दिला आहे. स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट लिमिटेड कंपनीने मागील वर्षी 11.55 कोटी रुपये कर थकवल्याच्या प्रकरणात कस्टम, अबकारी आणि सेवा कर अपीलीय न्यायाधिकरणाने कंपनीला मोठा दिलासा दिला आहे.

2011-12 या आर्थिक वर्षात केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट लिमिटेड कंपनीला 11.55 कोटी रुपये कर भरण्याची नोटीस धाडली होती. करचुकवेगिरीच्या या प्रकरणात कंपनी न्यायालयात गेली, आणि 6 नोव्हेंबर 2023 ला अपीलीय न्यायाधिकरणाने कंपनीने कोणताही कर थकवला नसल्याची माहिती दिली.

स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट लिमिटेड कंपनीने गुजरात राज्यात जामनगर याठिकाणी एक नवीन उत्पादन सुविधा केंद्र सुरू केला आहे. या अत्याधुनिक युनिटचा वापर कंपनी ब्रास आणि फोर्जिंग घटक इत्यादींचे उत्पादन करण्यासाठी करणार आहे. स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट लिमिटेड ही फवारणी करणारी कंपनी सध्या आपल्या जुन्या प्लांटमधून कामकाज करत आहे.

कंपनीचे नवीन प्लांट 3000 चौरस मीटरमध्ये पसरलेले असून ते थर्ड पार्टी प्रोव्हायडरकडून भाड्याने घेण्यात आले आहे. स्प्रे किंग अॅग्रो इक्विपमेंट्स लिमिटेड कंपनी नवीन उत्पादन केंद्र सुरू करून बाजारातील आपले स्थान आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sprayking Agro Share Price NSE 17 November 2023.

हॅशटॅग्स

Sprayking Agro Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x