22 November 2024 5:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

Nykaa Share Price | नायका शेअरचा परतावा धमाका! एकदिवसात 10 टक्के अप्पर सर्किट, तेजीचा फायदा घ्यावा?

Nykaa Share Price

Nykaa Share Price | नायका कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे नायका स्टॉक शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9.5 टक्क्यांच्या वाढीसह 167.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. दिवसभराच्या व्यवहारात नायका स्टॉक 170.10 रुपये या उच्चांक किमतीवर पोहचला होता. या कंपनीच्या शेअर्सनी आपली 11 महिन्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे.

नोव्हेंबर 2023 मध्ये एकूण 13 ट्रेडिंग सेशनपैकी 10 सेशनमध्ये नायका स्टॉक तेजीत वाढत होता. नायका कंपनीची मूळ कंपनी FSN E-Commerce Ventures आहे. शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी नायका स्टॉक 9.84 टक्के वाढीसह 168.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

नायका स्टॉक मागील काही काळापासून अप ट्रेंडमध्ये वाढत आहेत. या कंपनीचे शेअर सध्या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 47 टक्के वाढीसह ट्रेड करत आहेत. 26 एप्रिल 2023 रोजी नायका कंपनीचे शेअर्स 114.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

17 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 167.75 रुपये किमतीवर पोहचले होते. नायका कंपनीचे एकूण बाजार भांडवल 47882 कोटी रुपये आहे. मागील एका महिन्यात नायका कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 15 टक्के परतावा कमावून दिला आहे.

नायका कंपनीचा आयपीओ 1125 रुपये प्राइस बँडवर लाँच करण्यात आला होता. त्यांनतर या कंपनीने आपल्या शेअर धारकांना 5 बोनस शेअर्स वाटप केले होते. नायका कंपनीची मूळ कंपनी FSN E-Commerce Ventures Limited चा IPO 1085-1125 रुपये प्राइस बँडवर लाँच करण्यात आला होता. तर नायका कंपनीचा IPO स्टॉक 2000 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता.

नायका कंपनीचे शेअर्स लिस्टिंग झाल्यानंतर काही दिवसांनंतर स्टॉकमध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळाली होती. त्यानंतर या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 5 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nykaa Share Price NSE 18 November 2023.

हॅशटॅग्स

#Nykaa share Price(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x