13 December 2024 7:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

Tata Investment Share Price | टाटा तिथे नो घाटा! काही दिवसात या शेअरने 35% परतावा दिला, टाटा टेक IPO चा सुद्धा फायदा होणार

Tata Investment Share Price

Tata Investment Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 15 टक्क्यांच्या वाढीसह 4521.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील काही दिवसात या कंपनीचे शेअर्स 35 टक्क्यांनी वाढले आहेत.

शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 0.40 टक्के वाढीसह 4,519.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

2023 या वर्षात आतापर्यंत टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 112 टक्के परतावा कमावून दिला आहे. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, टाटा समूहाच्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ लाँच होणार आहे.

तब्बल 2 दशकांनंतर टाटा समूह आपल्या कंपनीचा IPO लॉन्च करणार आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन आणि टाटा मोटर्स या दोन्ही कंपन्यांनी मोठा वाटा काबीज केला आहे.

टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीने टाटा समूहातील टीसीएस, टाटा स्टील, टाटा कंझ्युमर प्रोडक्ट, टाटा केमिकल, टाटा एलक्सी आणि ट्रेंट या सर्व कंपन्यांमध्ये मोठे भाग भांडवल धारण केले आहे. 17 नोव्हेंबर 2023 रोजी टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीने सेबीला कळवले की, वैभव गोयल यांना कंपनीचे महाव्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वैभव गोयल यांना संबंधित क्षेत्रात काम करण्याचा 15 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Investment Share Price NSE 21 November 2023.

हॅशटॅग्स

Tata Investment Share Price(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x