5 December 2024 12:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY NTPC Green Share Price | मालामाल करणार NTPC ग्रीन शेअर, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - NSE: NTPCGREEN SIP Mutual Fund | ढीगभर पैसा जमा करायचा आहे मग, 'या' गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या नाहीतर सगळंच गमावून बसाल Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
x

Zen Technologies Share Price | भरवशाचा डिफेन्स क्षेत्रातील शेअर! 1000% परतावा दिल्यावर अजूनही पैशाचा पाऊस पडतोय

Zen Technologies Share Price

Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह 754 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील झेन टेक्नॉलॉजी स्टॉक मजबूत तेजीत धावत आहे. नुकताच झेन टेक्नॉलॉजी कंपनीला 42 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे.

भारत सरकारने झेन टेक्नॉलॉजी कंपनीला कोट्यवधी रुपये मूल्याचे काम दिले आहेत. आज मंगळवार दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी झेन टेक्नॉलॉजी स्टॉक 3.62 टक्के वाढीसह 786 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

भारतीय संरक्षण क्षेत्राला मजबूत करण्यासाठी आणि भारतात जास्तीत जास्त शस्त्रास्त्रे तयार व्हावीत म्हणून भारत सरकार प्रयत्न करत आहे. म्हणून झेन टेक्नॉलॉजी सारख्या कंपन्यांना अनेक ऑर्डर दिल्या जात आहेत. आणि परिणाम स्वरूप कंपन्यांचे शेअर्स देखील तेजीत आले आहेत.

26 ऑक्टोबर 2023 रोजी झेन टेक्नॉलॉजी कंपनीला भारतीय संरक्षण मंत्रालयाने 100 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली होती. सप्टेंबर 2023 मध्ये झेन टेक्नॉलॉजी कंपनीने सेबीला कळवले होते की, कंपनीला भारतीय संरक्षण मंत्रालयाने अँटी ड्रोन सिस्टमसाठी 227.85 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे.

झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध झाल्यापासून 1000 टक्क्यांनी वाढले आहेत. 2023 च्या सुरूवातीपासून आतपर्यंत झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर 189.95 रुपये किमतीवरून वाढून 758.55 रुपयेवर पोहचले आहेत. मागील 11 महिन्यांत झेन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 300 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 136 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zen Technologies Share Price NSE 21 November 2023.

हॅशटॅग्स

Zen Technologies Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x