22 November 2024 2:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

Patel Engineering Share Price | 51 रुपयाचा पटेल इंजिनिअरिंग शेअर अल्पावधीत बंपर कमाई करून देणार, टार्गेट प्राईस जाहीर

Patel Engineering Share Price

Patel Engineering Share Price | पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 54 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मागील दोन दिवसांपासून पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअरमध्ये 5 टक्के लोअर सर्किट पाहायला मिळत आहे.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 51.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मंगळवारी हा स्टॉक 54 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 13 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी पटेल इंजिनिअरिंग स्टॉक 4.35 टक्के घसरणीसह 51.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

25 ऑक्टोबर 2023 रोजी पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 44 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 29 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीच्या शेअरने 59.85 रुपये उच्चांक किंमत स्पर्श केली होती. तज्ञांच्या मते पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स पुढील एका आठवड्यात 60 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. म्हणजेच एका आठवड्यात या कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना किमान 10 टक्के कमाई करून देतील. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनी देखील पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत.

विजय केडिया यांनी पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई केली आहे. विजय केडिया यांनी मार्च 2023 मध्ये पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे 1.3 कोटी शेअर्स म्हणजेच जवळपास 1.7 टक्के भाग भांडवल धारण केले होते. पटेल इंजिनिअरिंग कंपनीमध्ये विजय केडिया यांनी 61 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Patel Engineering Share Price today on 22 November 2023

हॅशटॅग्स

Patel Engineering Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x