22 November 2024 7:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम
x

Flair Writing IPO | फ्लेअर रायटिंग IPO शेअर्सचा ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मालामाल करणार

Flair Writing Share Price

Flair Writing IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. पेन बनवणारी फ्लेअर रायटिंग कंपनीने आपला IPO गुंतवणुकीसाठी खुला आहे. या कंपनीचा IPO अवघ्या काही तासांत पूर्ण सबस्क्राइब झाला आहे. फ्लेअर रायटिंग कंपनीने अँकर गुंतवणूकदारांना शेअर्स विकून 177.90 कोटी रुपये भांडवल जमा केले आहे.

फ्लेअर रायटिंग कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची प्राइस बँड 288 रुपये ते 304 रुपये दरम्यान निश्चित केली आहे. या कंपनीचा IPO 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. फ्लेअर रायटिंग कंपनीचा IPO अवघ्या काही तासात 1.97 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे.

या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 1.97 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. तर पात्र संस्थागत गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 0.54 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 1.51 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे.

ग्रे मार्केटमध्ये फ्लेअर रायटिंग कंपनीचे शेअर्स अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत. फ्लेअर रायटिंग कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 60 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच या कंपनीचे शेअर्स 364 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. ज्या लोकांना या कंपनीचे शेअर्स वाटप केले जातील, त्यांना स्टॉक लिस्टिंगच्या पहील्याच दिवशी 19 टक्क्यांपेक्षा जास्त नफा मिळू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Flair Writing IPO GMP on 23 November 2023.

हॅशटॅग्स

Flair Writing Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x