Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाहीर, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
Ashok Leyland Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील शेअर बाजारात विक्रीचा दबाव होता, मात्र ऑटो इंडेक्समध्ये किंचित खरेदी पाहायला मिळत होती. सध्या जागतिक बाजार, डॉलर निर्देशांक आणि रोखे उत्पन्न यांच्या नकारात्मक कृतीचा थेट परिणाम शेअर बाजारातील व्यवहारावर पाहायला मिळत आहे.
अशा काळात शेअर बाजारातील तज्ञांनी अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज गुरूवार दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स 0.084 टक्के वाढीसह 178.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
ICICI सिक्युरिटीज फर्मने अल्पकालीन गुंतवणुकीसाठी अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी पुढील 3 महिन्यांसाठी अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स 172-178 रुपये दरम्यान खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
यासाठी तज्ञांनी अशोक लेलँड स्टॉकवर 202 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तज्ञांनी गुंतवणूकदारांना अशोक लेलँड स्टॉकमध्ये पैसे लावताना 163 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. अशोक लेलँड स्टॉकचा पहिला डाऊनसाईड सपोर्ट 173 रुपये किमतीवर आहे. तर दुसरा सपोर्ट 170 रुपये आणि तिसरा सपोर्ट 167 रुपये किमतीवर आहे. तज्ञांच्या मते अशोक लेलँड स्टॉकमध्ये 180 रुपये, त्यानंतर 182 रुपये आणि 186 रुपये किमतीवर अडथळा पाहायला मिळू शकतो.
अशोक लेलँड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 191.50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 133.10 रुपये होती. मागील एका आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 1.5 टक्क्यांनी मजबूत झाले आहे. तर मागील एका महिन्यात अशोक लेलँड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 3 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 5.6 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात अशोक लेलँड स्टॉक 24 टक्के आणि मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 23 टक्के मजबूत झाले आहेत. मागील तीन वर्षांत अशोक लेलँड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 95 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील आठवड्यात आलेल्या अपडेटनुसार अशोक लेलँड कंपनी आपल्या इलेक्ट्रिक वाहन शाखा असलेल्या स्विच मोबिलिटी कंपनीमध्ये बाह्य गुंतवणूक स्त्रोतामार्फत भांडवल मिळवण्यास इच्छुक आहे. कंपनीने म्हंटले आहे की, अशोक लेलँड कंपनी ‘योग्य धोरणात्मक भागीदार’च्या प्रतीक्षेत आहे. जोपर्यंत कंपनीला चांगला भागीदार मिळत नाही, तोपर्यंत अशोक लेलँड कंपनी स्वतःहून शक्य तेवढी गुंतवणूक करून कामकाज चालू ठेवेल.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Ashok Leyland Share Price NSE 23 November 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार