25 November 2024 12:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदी वाढली - NSE: RVNL Horoscope Today | विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायी; जीवनात नव्या मार्गांकडे होईल वाटचाल, पहा तुमचे राशिभविष्य Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE
x

Mamaearth Share Price | मामाअर्थ शेअर्स अल्पावधीत मल्टिबॅगर होणार? प्रतिदिन 12-15 टक्के परतावा मिळतोय, खरेदी करणार?

Mamaearth Share Price

Mamaearth Share Price | मामाअर्थ ब्रँडची मूळ कंपनी असलेल्या होनासा कंझ्युमर कंपनीचे शेअर 24 नोव्हेंबर 2023 रोजी 15 टक्क्यांच्या वाढीसह 475 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील दोन दिवसात होनासा कंझ्युमर कंपनीच्या शेअर्सची किंमत 32.6 टक्के वाढली आहे. 23 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते.

सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत होनासा कंझ्युमर कंपनीचा निव्वळ नफा दुप्पट वाढून 30 कोटी रुपयेवर पोहचला आहे. त्यानंतर होनासा कंझ्युमर स्टॉक तेजीत आला आहे. शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी होनासा कंझ्युमर स्टॉक 12.59 टक्के वाढीसह 477.10 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी होनासा कंझ्युमर स्टॉक 450.05 रुपये किमतीवर ओपन झाला होता. आणि काही तासात शेअरची खरेदी इतकी वाढली की, स्टॉक 15 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. जेफरीज फर्मने 23 नोव्हेंबर 2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या एका नोटमध्ये माहिती दिली आहे की, तज्ञांनी आता मॅरिको कंपनी शेअरच्या जागी होनासा कंझ्युमर कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने होनासा कंझ्युमर कंपनीच्या शेअरवर “बाय” रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी शेअरची लक्ष किंमत 530 रुपये निश्चित केली आहे.

जेफरीजने फर्मने होनासा कंझ्युमर कंपनीच्या स्टॉकवर ईपीएस अंदाज 5-6 टक्क्यांनी वाढवला आहे. होनासा कंझ्युमर कंपनीने सप्टेंबर तिमाहीत 21 टक्क्यांच्या वाढीसह 496 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. या कंपनीचे शेअर्स 7 नोव्हेंबर 2023 रोजी 324 रुपये किमतीवर शेअर बाजारात सूचिबद्ध झाले होते.

शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 46.63 टक्के परतावा कमावून दिला आहे. होनासा कंझ्युमर कंपनीच्या IPO चा आकार 1701 कोटी रुपये होता. हा IPO 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mamaearth Share Price NSE 25 November 2023.

हॅशटॅग्स

Mamaearth Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x