22 November 2024 3:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS
x

CG Power Share Price | पॉवरफुल शेअर! मागील 5 दिवसात दिला 22 टक्के परतावा, गुंतवणुकीची होत योग्य वेळ?

CG Power Share Price

CG Power Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात विक्रीचा दबाव असताना देखील सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्यूशन कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत होते. एका दिवसात या कंपनीचे शेअर्स 386 रुपये नीचांक किंमतीवरून वाढून 470 रुपये किमतीवर पोहचले होते. सीजी पॉवर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 71610 कोटी रुपये आहे.

सीजी पॉवर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 503 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 247 रुपये होती. CG पॉवर कंपनीने नुकताच नवीन सेमीकंडक्टर युनिट स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत. शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी सीजी पॉवर स्टॉक 6.91 टक्के घसरणीसह 428.50 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

सीजी पॉवर कंपनीने आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली आणि चाचणी सुविधा उभारण्याचा मानस व्यक्त केला आहे. सीजी पॉवर कंपनी 791 दशलक्ष डॉलर्स गुंतवणूक करून सेमीकंडक्टर युनिट स्थापन करणार आहे. पुढील 5 वर्षांत सीजी पॉवर कंपनी सेमीकंडक्टर असेंबली युनिटसाठी 6592 कोटी रुपये गुंतवणूक करण्यास तयार आहे.

भारत सरकारने देशातील सेमीकंडक्टर उत्पादनाला चालना देण्यासाठी सबसिडी योजना देखील जाहीर केली आहे. सीजी पॉवर कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, या प्रकल्पावर संयुक्त उद्यम भागीदारा मार्फत इक्विटी योगदान आणि कर्ज उभारणी करून 12000 कोटी रुपये गुंतवणूक होऊ शकते.

सीजी पॉवर कंपनीने भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाकडे अर्ज सादर करून विनंती केली की, कंपनी आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंब्ली आणि चाचणी सुविधा युनिट सेटअप करण्यास इच्छुक आहे. आणि कंपनीने या प्रकल्पासाठी भारत सरकारकडून अनुदान मिळण्याची विनंती केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सुविधा केंद्र संयुक्त उपक्रमांतर्गत स्थापन केले जाणार आहे.

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सीजी पॉवर स्टॉक 2.41 टक्क्यांच्या वाढीसह 480 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 दिवसात सीजी पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 22 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 26 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत सीजी पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 36 टक्के वाढवले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | CG Power Share Price NSE 25 November 2023.

हॅशटॅग्स

CG Power Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x