16 April 2025 6:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN
x

Rights Issue | शेअरची किंमत 65 रुपये, अल्पावधीत दिला 250% परतावा, राइट्स इश्यू बातमीने फायद्यासाठी खरेदी वाढली

Rights Issue

Rights Issue | बँग ओव्हरसीज या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 90 कोटी रुपये आहे. 2009 मध्ये या कंपनीचे शेअर्स 275 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र त्यानंतर हा स्टॉक विक्रीच्या दबावात आला आणि शेअरमध्ये जोरदार घसरण सुरू झाली. मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँग ओव्हरसीज कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 68 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. Bang Overseas Share Price

गुरुवारी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली, ज्यात कंपनीने राईट्स इश्यूला मान्यता दिली आहे. बँग ओव्हरसीज कंपनीने 50 कोटी रुपये मूल्याचे राइट्स इश्यू जारी करण्याची घोषणा केली आहे. शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी बँग ओव्हरसीज स्टॉक 4.53 टक्के घसरणीसह 65.30 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

मागील एका महिन्यात बँग ओव्हरसीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 48 टक्के नफा मिळवून दिला आहे. मागील तीन वर्षात बँग ओव्हरसीज कंपनीच्या शेअरची किंमत 250 टक्के वाढली आहे. या कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 72.98 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.

आर्थिक वर्ष 2022-23 मधील जुलै-सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत, आर्थिक वर्ष 2023-24 च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत बँग ओव्हरसीज कंपनीला 3.64 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे. मागील आर्थिक वर्षात बँग ओव्हरसीज कंपनीने 28.37 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर या तिमाहीत कंपनीने 30.42 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

सध्या बँग ओव्हरसीज कंपनीचे शेअर्स ESM फ्रेमवर्कमध्ये आहेत. ESM म्हणजेच Enhanced Surveillance Measures. ज्या कंपन्यांचे भाग भांडवल 500 कोटी रुपये पेक्षा कमी असते, अशा कंपन्याच्या शेअरमधील जास्त चढ-उतार टाळण्यासाठी सेबी त्यांना ESM अंतर्गत ठेवते. ESM म्हणजेच एक प्रगत पाळत ठेवण्याचा उपाय आहे. SEBI च्या सूचनांचे पालन करून, स्टॉक एक्सचेंजने एन्हांस्ड सर्व्हिलन्स मेजर हा नवीन नियम बनवला आहे.

शेअर बाजारातील ऑपरेटर्सद्वारे केले जाणारे शेअर्सचे पंप-डंपिंग थांबवणे आणि लहान गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे हा ESM या नवीन प्रणालीचा उद्देश आहे. बँग ओव्हरसीज ही कंपनी मुख्यतः वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यवसाय करते. या कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून कंपनीची स्थापना 1992 साली झाली होती. बँग ओव्हरसीज कंपनी पुरुषांचे पोशाख बनवण्याचा व्यवसाय देखील करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rights Issue of Bang Overseas Share Price 27 November 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Rights Issue(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या