22 November 2024 9:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Gold Rate Today | बापरे! आज एकदिवसात सोन्याचे भाव गगनाला भिडले, लग्नकार्याच्या दिवसात सोन्याचा भाव किती महाग होणार?

Gold Rate Today

Gold Rate Today | आज सोन्याच्या दरात मोठी वाढ होऊन नवा उच्चांक गाठला आहे. याआधी 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोने ६१५८५ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर होते. 22 कॅरेट, 24 कॅरेट, 10 कॅरेट, 14 कॅरेट ani 18 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दराने दिला जात आहे.

आज सराफा बाजारात सोन्याचा भाव किती?
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 61895 रुपयांवर खुला झाला आहे. सोन्याच्या दरातील हा नवा उच्चांक आहे. तर आदल्या दिवशी सोने 61437 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. त्यामुळे आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 458 रुपयांनी वधारला आहे.

आज चांदीचा भाव
आज चांदीचा भाव 74,993 रुपये प्रति किलो झाला आहे. आदल्या दिवशी चांदी 73046 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. त्यामुळे चांदीचा भाव आज 1947 रुपये प्रति किलोच्या वाढीसह उघडला आहे. चांदी 1471 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली व्यवहार करत आहे. 4 मे 2023 रोजी चांदीने 76464 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

कोणत्या कॅरेट सोन्याचा आजचा दर किती?

आज 10 कॅरेट सोन्याचा भाव किती?
आज 10 कॅरेट म्हणजेच 41.7 टक्के शुद्ध सोन्याचा दर 36209 रुपये आहे. कालच्या तुलनेत आज हा दर २६८ रुपयांनी वाढला आहे.

आज 14 कॅरेट सोन्याचा भाव किती?
आज 14 कॅरेट म्हणजेच 58.3 टक्के शुद्ध सोन्याचा दर 46421 रुपये आहे. कालच्या तुलनेत आज दरात ३४३ रुपयांची वाढ झाली आहे.

आज 18 कॅरेट सोन्याचा भाव किती?
आज 18 कॅरेट म्हणजेच 75.0 टक्के शुद्ध सोन्याचा दर आता 56696 रुपये झाला आहे. कालच्या तुलनेत आज दरात ४२० रुपयांची वाढ झाली आहे.

आज 22 कॅरेट सोन्याचा भाव किती?
आज 22 कॅरेट म्हणजेच 91.7 टक्के शुद्ध सोन्याचा दर 61647 रुपये आहे. कालच्या तुलनेत आज हा दर ४५६ रुपयांनी वाढला आहे.

आज 24 कॅरेट सोन्याचा भाव किती?
आज 24 कॅरेट म्हणजेच 99.9 टक्के शुद्ध सोन्याचा दर 61895 रुपये आहे. कालच्या तुलनेत आज हा दर ४५८ रुपयांनी वाढला आहे.

आज एमसीएक्सवर कोणत्या दराने सोन्याचा व्यवहार?
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) दुपारी १२ वाजता सोने तेजीसह व्यवहार करत आहे. आज सोन्याचा वायदा व्यापार 116.00 रुपयांच्या वाढीसह 61,656.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर चांदीचा वायदा व्यापार 87.00 रुपयांनी घसरून 74,719.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates Check details 28 November 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x