26 April 2025 5:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर पुन्हा मालामाल करणार, यापूर्वी 464% परतावा दिला - NSE: NTPC Horoscope Today | 27 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 27 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | आयआरबी शेअर्सबाबत फायद्याची अपडेट, 46 रुपयांच्या शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRB NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC HUDCO Share Price | सरकारी कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, पुढे मिळेल मोठा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO AWL Share Price | अदानी वील्मर शेअरमध्ये जबरदस्त तेजीचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: AWL
x

Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी IPO गुंतवणुकदारांना मालामाल, IPO शेअर्सचे वाटप तपासण्याची प्रक्रिया जाणून घ्या

Tata Technologies IPO

Tata Technologies IPO | काही दिवसांपूर्वी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. शेवटच्या दिवशी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO ला 69.4 पट अधिक सबस्क्रिप्शन मिळाले होते. या कंपनीचा IPO 22 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या IPO च्या माध्यमातून 3042 कोटी रुपये भांडवल उभारणीचे लक्ष निर्धारित केले होते. आता गुंतवणूकदार IPO शेअर वाटपाची प्रतीक्षा करत आहेत.

IPO स्टॉक वाटप तपासण्याची प्रक्रिया
1) https://www.nseindia.com/ या संकेस्थळावर भेट द्या.
2) ‘इक्विटी’ पर्यायवर क्लिक करून ड्रॉपडाउनमध्ये ‘टाटा टेक्नॉलॉजीज आयपीओ’ पर्याय निवडा.
3) अर्ज क्रमांक आणि पॅन कार्ड तपशील नमूद करा.
4) ‘मी रोबोट नाही’ या पर्यायावर क्लिक करा.
5) त्यात IPO मध्ये तुम्हाला शेअर्सचे वाटप झाले आहे की नाही हे तुम्ही चेक करु शकता.

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO मध्ये QIB साठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 203.41 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 62.11 पट अधिक सबस्क्राईब करण्यात आला होता. भरला गेला. किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 16.50 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. या कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसई इंडेक्सवर 5 डिसेंबर 2023 रोजी सूचीबद्ध केले जातील.

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या आयपीओमध्ये शेअरची किंमत बँड 475-500 रुपये प्रति शेअर निश्चित केली होती. या कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य प्रति शेअर 2 रुपये आहे. टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीने आयपीओ अंतर्गत बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून शेअरची ऑफर किंमत 500 रुपये निश्चित केली होती.

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने प्री-आयपीओमध्ये 67 अँकर गुंतवणूकदारांकडून 791 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. कंपनीने 1.58 कोटी शेअर्स 500 रुपये किमतीने अँकर गुंतवणूकदारांना विकले आहेत. अँकर गुंतवणूकदारांमध्ये फिडेलिटी फंडने कंपनीचे 5.3 टक्के भाग भांडवल खरेदी केले होते. तर एसबीआय फंडने देखील 5.3 टक्के भाग भांडवल खरेदी केले होते.

आयसीआयसीआय प्रू फंडने टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे 5.3 टक्के, आणि बीएनपी परिबासने 4.05 टक्के, भाग भांडवल खरेदी केले आहेत. एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनीने टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे 4.05 टक्के आणि निप्पॉन इंडिया फंडने 4.04 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Technologies IPO for investment on 28 November 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Tata Technologies IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या