18 October 2024 1:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर देणार मोठा परतावा, शेअरखान ब्रोकरेजचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: HAL NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: NBCC Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेंदाता शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, रिपोर्टमध्ये तुफान तेजीचे संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत फायद्याची अपडेट, पेनी शेअरवर होणार परिणाम - NSE: IDEA Wipro Share Price | आता नाही थांबणार, रॉकेट स्पीडने होणार कमाई, विप्रो शेअर करणार मालामाल - NSE: WIPRO IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलीश, यापूर्वी दिला 270% परतावा - NSE: IREDA Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित या 9 शेअर्ससाठी 'BUY रेटिंग, मिळेल 30% पर्यंत परतावा - NSE: Reliance
x

Aster DM Share Price | 1 दिवसात 20 टक्के परतावा देणाऱ्या एस्टर डीएम हेल्थकेअर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, नेमकं कारण काय?

Aster DM Share Price

Aster DM Share Price | एस्टर डीएम हेल्थकेअर या आरोग्यसेवा सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. ट्रेडिंग सेशन दरम्यान एस्टर डीएम हेल्थकेअर कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 399.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसा अखेर या कंपनीचे शेअर्स 396.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज गुरूवार दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी एस्टर डीएम हेल्थकेअर कंपनीचे शेअर्स 2.63 टक्के घसरणीसह 385.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

वास्तविक, एस्टर डीएम हेल्थकेअर कंपनी भारत आणि आखाती देशांमध्ये आपला व्यवसाय करते. मंगळवारी एस्टर डीएम हेल्थकेअर कंपनीने जाहीर केलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या संचालक मंडळाने आणि उपकंपनी अॅफिनिटी होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेडने भारत आणि गल्फ को-ऑपरेशन कौन्सिलचा व्यवसाय दोन स्वतंत्र संस्थांमध्ये विलग करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

या सेपरेशन प्लॅन अंतर्गत, अॅफिनिटी होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने एस्टर डीएम हेल्थकेअर कंपनीच्या व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीमध्ये मुख्यालय असलेल्या Fajr Capital या खाजगी इक्विटी फर्मसोबत करार केला आहे.

फज्र कॅपिटल कंपनीने एस्टर डीएम हेल्थकेअर कंपनीचे 65 टक्के भाग भांडवल घेण्याचे निश्चित केले आहे. एस्टर डीएम हेल्थकेअर कंपनीचे भारत आणि GCC व्यवसायांचे एकत्रित बाजार भांडवल दोन अब्ज डॉलर्स आहे. या व्यवहारामुळे एस्टर डीएम हेल्थकेअर कंपनीच्या GCC व्यवसायाचे एंटरप्राइझ मूल्य 1.7 अब्ज डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात 13,540 कोटी रुपये आहे.

एस्टर डीएम हेल्थकेअर कंपनी गल्फ को-ऑपरेशन कौन्सिलच्या सहा देशात आरोग्य सेवा प्रदान करणारी अग्रणी कंपनी मानली जाते. आर्थिक वर्ष 2027 पर्यंत एस्टर डीएम हेल्थकेअर कंपनी आपल्या बेड क्षमतेत 1,500 खाटाची वाढ करणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Aster DM Share Price NSE 30 November 2023.

हॅशटॅग्स

Aster DM Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x