23 November 2024 3:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Rockingdeals Share Price | रॉकिंग शेअर! एकदिवसात 114% परतावा, रॉकिंगडील्स सर्कुलर शेअर्समध्ये वेळीच गुंतवणूक करावी का?

Rockingdeals Share Price

Rockingdeals Share Price | रॉकिंगडील्स सर्कुलर या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी शेअर धारकांना मालामाल केले आहे. या कंपनीच्या शेअरने स्टॉक मार्केटमध्ये शानदार एन्ट्री केली आहे. रॉकिंगडील्स सर्कुलर कंपनीचे शेअर्स 114.29 टक्के प्रीमियम वाढीससह 300 रुपये किमतीला शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत.

या कंपनीचे IPO शेअर्स 140 रुपये किमतीवर वाटप करण्यात आले होते. आता लिस्टिंगनंतर गुंतवणूकदारांनी प्रत्येक शेअरवर 160 रुपये नफा कमावला आहे. आज शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजी रॉकिंगडील्स सर्कुलर स्टॉक 5.00 टक्के घसरणीसह 299.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

रॉकिंगडील्स सर्कुलर कंपनीच्या शेअरने पहिल्याच दिवशी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहेत. शेअर बाजारात स्टॉक लिस्ट झाल्यावर कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 315 रुपये किमतीवर पोहोचले होते. म्हणजेच कंपनीच्या शेअर्समध्ये इश्यू प्राईसच्या तुलनेत 175 रुपयांची वाढ झाली होती.

रॉकिंगडील्स सर्कुलर कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 136-140 रुपये निश्चित केली होती. या कंपनीचा IPO 22 नोव्हेंबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. तर IPO ची अंतिम मुदत 24 नोव्हेंबर 2023 रोजी संपली होती. रॉकिंगडील्स सर्कुलर कंपनीचे शेअर्स NSE SME एक्सचेंजवर सूचीबद्ध झाले आहेत.

रॉकिंगडील्स सर्कुलर कंपनीचा IPO 213 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 201.42 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. तर गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 458.60 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.

क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा राखीव कोटा 47.38 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदार या कंपनीच्या IPO मध्ये फक्त 1 लॉट खरेदी करू शकत होते. एका लॉटमध्ये कंपनीने फक्त 1000 शेअर्स ठेवले होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी 140000 रुपये जमा करावे लागले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rockingdeals Share Price NSE 01 December 2023.

हॅशटॅग्स

Rockingdeals Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x