23 November 2024 4:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या आठवडय़ात सोन्याच्या दरात जवळपास दररोज वाढ झाली होती. मात्र, सोमवारी सराफा बाजार बंद होता. त्यामुळे गेल्या आठवड्यात केवळ 4 दिवसांत सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. दरम्यान, चांदीच्या दरातही झपाट्याने वाढ झाली आहे. याशिवाय गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीनेही उच्चांक गाठला आहे. जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर.

सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ७२,००० पर्यंत जाऊ शकतो?
२०२४ मध्ये सोन्याच्या दरात ही तेजी दिसून येते. केडिया अॅडव्हायजरीचे अध्यक्ष अजय केडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांत सोन्याने खूप चांगला परतावा दिला आहे. त्यानुसार पुढील वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये सोन्याचा भाव ६८,००० ते ७२,००० रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो.

सोन्याचा भाव किती वाढला?
गेल्या आठवड्यात शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 62728 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर मंगळवारी सोन्याचा भाव 61913 रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद झाला होता. त्यामुळे संपूर्ण आठवडय़ात सोन्याचा भाव सुमारे ८१५ रुपये प्रति दहा ग्रॅमच्या वाढीसह बंद झाला आहे.

चांदीच्या दरातही आठवड्यात झपाट्याने वाढ
तर चांदीच्या दरातही गेल्या आठवड्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी सोन्याचा भाव 76400 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. तर चांदीचा भाव मंगळवारी 74889 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. त्यामुळे आठवडय़ात चांदीचा दर प्रति किलो १५११ रुपयांनी वधारून बंद झाला.

गेल्या आठवड्यात सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती
गेल्या आठवड्यात २९ नोव्हेंबर २०२३ रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्या दिवशी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ६२६२९ रुपयांवर गेला होता. याशिवाय चांदीनेही गेल्या आठवड्यात उच्चांक गाठला आहे. 30 नोव्हेंबर 2023 रोजी चांदीने 76934 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

आठवडाभरात कोणत्या कॅरेट सोन्याचे दर किती बदलले

आज 10 कॅरेट सोन्याचा भाव
10 कॅरेट म्हणजेच 41.7 टक्के शुद्ध सोन्याचा भाव 36695 रुपयांवर बंद झाला आहे. मंगळवारच्या तुलनेत हा दर ४७६ रुपयांनी वाढला आहे.

आज 10 कॅरेट सोन्याचा भाव
14 कॅरेट म्हणजेच 58.3 टक्के शुद्ध सोन्याचा भाव 47046 रुपयांवर बंद झाला आहे. मंगळवारच्या तुलनेत हा दर ६११ रुपयांनी वाढला आहे.

आज 10 कॅरेट सोन्याचा भाव
18 कॅरेट म्हणजेच 75.0 टक्के शुद्ध सोन्याचा भाव 57458 रुपयांवर बंद झाला आहे. मंगळवारच्या तुलनेत हा दर ७४६ रुपयांनी वाढला आहे.

आज 10 कॅरेट सोन्याचा भाव
22 कॅरेट म्हणजेच 91.7 टक्के शुद्ध सोन्याचा भाव 62477 रुपयांवर बंद झाला आहे. मंगळवारच्या तुलनेत हा दर ८१२ रुपयांनी वाढला आहे.

आज 10 कॅरेट सोन्याचा भाव
24 कॅरेट म्हणजेच 99.9 टक्के शुद्ध सोन्याचा भाव 62727 रुपयांवर बंद झाला आहे. मंगळवारच्या तुलनेत हा दर ८१४ रुपयांनी वाढला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title :  Gold Rate Today Updates Check Details 03 December 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x