25 April 2025 11:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATATECH Rattan Power Share Price | पेनी स्टॉकमध्ये घसरगुंडी, यापूर्वी दिला 726% परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RTNPOWER Life Insurance Claim | पगारदारांनो, इन्शुरन्स क्लेम करताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे बुडतील, कुटुंबही अडचणीत येईल EPFO Money News | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो तुमची बेसिक सॅलरी किती? खात्यात इतकी रक्कम जमा होणार, अपडेट पहा Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नीच्या नावावर पोस्ट ऑफिसमध्ये FD करा, 2 वर्षांनंतर किती परतावा मिळेल पहा Horoscope Today | 25 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रावरचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रावरचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

PVR Share Price | बॉक्स ऑफिसवर ॲनिमल आणि टायगर-3 चित्रपटाचा धुमाकूळ, PVR शेअर्स तेजीत, पुढची टार्गेट प्राईस पहा

PVR Share Price

PVR Share Price | सध्या सिनेमा गृहात रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, यांचा मल्टीस्टारर चित्रपट ॲनिमल धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 60 कोटी रुपये कमाई केली होती. याचा फायदा पीव्हीआर आयनॉक्स कंपनीला झाला आहे.

पीव्हीआर आयनॉक्स कंपनीचे शेअर मागील आठवड्यात शुक्रवारी 2 टक्क्यांच्या वाढीसह 1755.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.97 टक्के वाढीसह 1,757.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटी फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, क्रिकेट विश्वचषकामुळे डिसेंबर 2023 तिमाहीमध्ये बॉक्स ऑफिस कलेक्शन किंचित घटले होते. पीव्हीआर आयनॉक्स कंपनीसाठी मागील तिमाही फारशी फायदेशीर ठरली नव्हती. कंपनीच्या जाहिरात महसुलात हळूहळू सुधारणा होत असून कंपनीने आपले कर्ज कमी करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

नुवामा फर्मच्या तज्ञांनी पीव्हीआर आयनॉक्स स्टॉकची लक्ष्य किंमत 2,210 रुपये निश्चित केली आहे. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पीव्हीआर आयनॉक्स कंपनीच्या डिसेंबर 2023 तिमाहीची सुरुवात काही मोठ्या चित्रपटांच्या आगमनाने झाली होती. आणि ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये लिओ, फुक्रे, टायगर 3 आणि 12 वी फेल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मजबूत कामगिरी केली होती.

पीव्हीआर आयनॉक्स या भारतातील सर्वात मोठ्या मल्टिप्लेक्स ऑपरेटर कंपनीने आर्थिक वर्ष 2024-25 पर्यंत 500 कोटी रुपये गुंतवणुक करून भारतात 150 स्क्रीन सुरू करण्याची योजना आखली आहे. सध्या पीव्हीआर आयनॉक्स कंपनी भारतातील 114 शहरांमध्ये 1,711 स्क्रीन ऑपरेट करते.

आता या कंपनीने मेसन आयनॉक्स याठिकाणी सहा स्क्रीनचा लक्झरी सिनेमा हॉल उघडला आहे. पीव्हीआर आयनॉक्स कंपनीने म्हंटले आहे की, साधारणपणे एका स्क्रीनसाठी 5 कोटी रुपये गुंतवणूक करावे लागतात. मात्र लक्झरी मल्टिप्लेक्ससाठी प्रति स्क्रीन 7 कोटी रुपयेची गुंतवणूक केली जाते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PVR Share Price NSE 04 December 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#PVR Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या