22 November 2024 11:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Stocks To Buy | या स्मॉलकॅप शेअरचा तपशील सेव्ह करा, मिळेल 40 टक्के परतावा, अल्पावधीत मोठी कमाई

Stocks To Buy

Stocks To Buy | पिट्टी इंजीनियरिंग या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स जोरदार तेजीत वाढत आहेत. पिट्टी इंजीनियरिंग ही कंपनी इलेक्ट्रिकल स्टील लॅमिनेशन, मोटर कोर, सब-असेंबली, डाय-कास्ट रोटर्स आणि प्रेस टूल्स उत्पादन करणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी मानली जाते. या कंपनीचे जुने नाव पिट्टी लॅमिनेशन लिमिटेड असे होते. अॅक्सिस सिक्युरिटीज फर्मने आपल्या अहवालात पिट्टी इंजीनियरिंग कंपनीच्या शेअरवर ‘बाय’ रेटिंग दिली आहे.

तज्ञांनी या स्टॉकवर 915 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. ही लक्ष किंमत शेअरच्या सध्याच्या किमतीच्या तुलनेत 40 टक्के जास्त आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पिट्टी इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 658.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी पिट्टी इंजीनियरिंग स्टॉक 6.12 टक्के वाढीसह 700 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

मागील 6 महिन्यांत पिट्टी इंजीनियरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 90 टक्के परतावा कमावून दिला आहे. पिट्टी इंजीनियरिंग कंपनी बाजारातील मागणीनुसार उत्पादने विकसित करण्याचे काम करते. म्हणून कंपनीचा नफा सुधारतो.

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये पिट्टी इंजीनियरिंग कंपनीचा EBITDA प्रति टन 5 टक्के वाढला होता. यामुळे कंपनीच्या नफ्यात देखील 51 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. कंपनीच्या निर्यात ऑर्डरमधून मिळणारा महसूल वार्षिक आधारावर 25 टक्क्यांच्या वाढीसह 371 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

तज्ञांच्या मते, पिट्टी इंजीनियरिंग कंपनीचा महसूल आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत 13 टक्क्यांच्या CAGR वाढीसह 1,588 कोटी रुपयेवर जाईल. तर कंपनीचा EBITDA आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत 13 टक्के CAGR वाढीसह 258 कोटीवर जाण्याची शक्यता आहे. कंपनीच्या आर्थिक कामगिरीत वाढ प्रामुख्याने मूल्यवर्धित उत्पादनांच्या वाढीमुळे होईल. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर पुढील काळात 915 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. म्हणून तज्ञांनी पिट्टी इंजीनियरिंग स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग दिली आहे.

आर्थिक वर्ष 2023-24 च्या सप्टेंबर तिमाहीत पिट्टी इंजीनियरिंग कंपनीने 290.29 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर कंपनीने 22.55 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. सप्टेंबर 2023 अखेरच्या शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार पिट्टी इंजीनियरिंग कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे एकूण 59.29 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी कंपनीचे 40.71 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy call for investment 04 December 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x