22 November 2024 10:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

LIC Share Price | बापरे! एलआयसी शेअर्स 'या' किंमतीवर पोहोचणार, पहा किती मजबूत फायदा मिळणार गुंतवणूकदारांना

LIC Share Price

LIC Share Price | एलआयसी कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये एलआयसी या सरकारी विमा कंपनीच्या शेअरने जबरदस्त कामगिरी केली आहे. आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहेत. तब्बल 11 महिन्यांनंतर एलआयसी कंपनीचे शेअर्स 700 रुपये किमतीच्या पार गेले आहे.

नोव्हेंबर 2023 मध्ये या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 12.83 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 6 डिसेंबर 2023 रोजी एलआयसी स्टॉक 4.19 टक्के वाढीसह 743.95 रुपये किमतीवर ट्रेड करता आहेत.

एलआयसी कंपनीचे शेअर्स मे 2022 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. सध्या एलआयसी स्टॉक 754.20 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या आसपास ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये इतकी तेजी येण्याचे कारण म्हणजे, एलआयसी कंपनीने नुकताच ‘जीवन उत्सव’ या नावाने एक योजना जाहीर केली आहे.

विमा गुंतवणुकदार एलआयसी कंपनीच्या योजनेत 5 वर्षे ते 16 वर्षे कालावधीसाठी गुंतवणूक करू शकतात. ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, पुढील काळात एलआयसी स्टॉक 1040 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत टक्क्यांनी वाढू शकतो. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एलआयसी कंपनीचे शेअर्स 1.1 टक्क्यांच्या घसरणीसह 712 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | LIC Share Price today NSE 06 December 2023.

हॅशटॅग्स

#LIC Share Price(104)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x