19 April 2025 8:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर्स खरेदी करावे की विकून टाकावे? शेअर्सबाबत तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला

Tata Technologies Share Price

Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. या कंपनीच्या शेअरने पहील्याच दिवशी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. मागील महिन्यात 30 नोव्हेंबर 2023 रोजी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 500 रुपये इश्यू किमतीवर वाटप करण्यात आले होते आणि 1200 रुपये किमतीवर शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते.

स्टॉक लिस्टिंगच्या अवघ्या काही तासात टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने 1400 रुपये किंमत स्पर्श केली केली होती. आज शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.72 टक्के वाढीसह 1,206.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किमतीवरून 17 टक्क्यांनी घसरले होते. या कंपनीच्या शेअरने 1150 रुपये किमतीवर ट्रेडिंग करायला सुरुवात केली होती. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1220 रुपये किमतीवर पोहचले होते.

उच्च किंमतीवर स्टॉक लिस्टिंग झाल्यामुळे साहजिकच या स्टॉकमध्ये नफा वसुली होईल. म्हणून तज्ञांनी रिट्रेसमेंटवर टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुंतवणुकदार टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1175 ते 1205 रुपये किमती दरम्यान खरेदी करू शकतात. बऱ्याच गुंतवणुकदारांनी या कंपनीचे शेअर्स उच्च किंमत पातळीवर विकून नफा वसुली केली आहे. अशा काळात हा स्टॉक स्थिर झाला की, चांगली तेजी नोंदवू शकतो, असे तज्ञांचे मत आहे.

टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध झाल्यावर अनेक नवीन गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये 1150 रुपये किंमत पातळीवर खरेदी केली होती. बंपर ओपनिंग झाल्यापासून, नवीन गुंतवणूकदार या स्टॉकमध्ये रिट्रेसमेंटची संधी शोधत आहेत. जर या कंपनीचे शेअर्स 1400 रुपये या उच्च किंमतीच्या पार गेला ते त्यात 17 टक्के रिट्रेसमेंट पाहायला मिळेल. काही तज्ञांनी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स घसरणीत खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Technologies Share Price NSE 08 December 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Tata Technologies Share Price(60)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या