23 April 2025 4:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | शेअर असावा तर असा, तब्बल 1,33,786 टक्के परतावा, संयम पळणारे श्रीमंत झाले - NSE: BEL Bonus Share News | अशी संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: UEL Horoscope Today | 23 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | आयआरबी शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IRB Reliance Power Share Price | शेअर प्राईस 43 रुपये; रिलायन्स पॉवर शेअर्सबाबत फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Apollo Micro Systems Share Price | तगडा परतावा मिळेल, हा डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार - NSE: APOLLO Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 23 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

SJVN Share Price | शेअरची किंमत 88 रुपये! अल्पावधीत मिळेल 50 टक्क्यांहून अधिक परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले पहा

SJVN Share Price

SJVN Share Price | एसजेवीएन लिमिटेड या वीज निर्मिती करणाऱ्या कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीत वाढत होते. गुरुवारी एसजेवीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 91.76 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर या कंपनीचे शेअर्स 7.78 टक्के वाढीसह 90.92 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी एसजेवीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.37 टक्के घसरणीसह 88.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ब्रोकरेज फर्म मोनार्क नेटवर्थ कॅपिटल लिमिटेडने एसजेवीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील तीन ते पाच वर्षांत या कंपनीचे शेअर्स दुप्पट किंवा तिप्पट परतावा देऊ शकतात. तज्ञांनी एसजेवीएन लिमिटेड कंपनीच्या शेअरवर 125 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. 2023 या वर्षात एसजेवीएन लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 177 टक्के परतावा कमावून दिला आहे.

ब्रोकरेज फर्मच्या मते, एसजेवीएन लिमिटेड कंपनी जलविद्युत आणि कोळसा-आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्प आणि अक्षय ऊर्जा स्त्रोतांमध्ये गुंतवणूक करून आपली स्थापित क्षमता 2.1 GW पेक्षा अधिक वाढवण्याची योजना आखत आहे. भारताचा वार्षिक दरडोई ऊर्जा वापर 1,297 kWh आहे, जो जागतिक सरासरीच्या सुमारे एक तृतीयांश आहे. आर्थिक वर्ष 2016-22 मध्ये 2.2 टक्के या वार्षिक दराने ऊर्जेच्या वापरत वाढ झाली आहे.

ब्रोकरेज फर्मने एसजेवीएन लिमिटेड कंपनीच्या शेअरवर 125 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या अंदाजानुसार, या कंपनीचे शेअर्स दीर्घ कालावधीमध्ये 166 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. नुकताच SJVN लिमिटेड कंपनीने 60 मेगावॅट क्षमतेचा नटवर मोरी जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित केला आहे. तीस मेगावॅट क्षमतेच्या दुसऱ्या युनिटमधून नॅशनल ग्रीडला वीजपुरवठा करण्याचे काम देखील सुरू करण्यात आले आहे. हा प्रकल्प उत्तराखंड राज्याचा उत्तरकाशी जिल्ह्यात यमुनेची प्रमुख उपनदी टोन्सवर बनवण्यात आला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SJVN Share Price NSE 08 December 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

SJVN Share price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या