22 November 2024 10:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS
x

IREDA Share Price | शेअरची किंमत 71 रुपये, फक्त 15 दिवसात दिला 100 टक्के परतावा, वेळीच एंट्री घेणार?

IREDA Share Price

IREDA Share Price | इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड किंवा IREDA या सरकारी कंपनीचे शेअर्स नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IREDA कंपनीचे शेअर्स 14 टक्क्यांच्या वाढीसह 73.67 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मिनीरत्न दर्जा असलेल्या IREDA कंपनीचा शेअर गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 64.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

IREDA कंपनीचा IPO 15 दिवसांपूर्वी 32 रुपये अप्पर किंमत किंमत बँडवर लाँच करण्यात आला होता. या कंपनीच्या शेअर्स अवघ्या 15 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी IREDA कंपनीचे शेअर्स 11.53 टक्के वाढीसह 71.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

IREDA कंपनीचे शेअर्स 32 रुपयेवरून वाढून 73 रुपये किमतीवर पोहचले होते. या कंपनीचा IPO 21 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. IREDA कंपनीच्या आयपीओची किंमत बँड 30-32 रुपये होती. या कंपनीचे शेअर्स 32 रुपये किमतीवर वाटप करण्यात आले होते. तर 29 नोव्हेंबर 2023 रोजी IREDA कंपनीचे शेअर्स 50 रुपये किमतीवर शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले. मागील 15 दिवसांत IREDA कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 100 टक्के वाढवले आहेत.

IREDA कंपनीचा IPO 38 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 7.73 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. तर गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 24.16 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. IREDA कंपनीच्या IPO मध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांचा राखीव कोटा 104.57 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.

IREDA कंपनीने आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी जो भाग राखीव ठेवला होता, तो कोटा 9.80 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदार या कंपनीच्या IPO मध्ये किमान 1 लॉट आणि कमाल 13 लॉट खरेदी करू शकत होते. या कंपनीने आपल्या IPO च्या एका लॉटमध्ये 460 शेअर्स ठेवले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE 09 December 2023.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(116)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x