Multibagger Stocks | होय! या शेअरने 1 महिन्यात दिला 60 टक्के परतावा, वेळीच खरेदी करून मल्टिबॅगर कमाई करणार?
Multibagger Stocks | रेस इको चेन लिमिटेड या वेस्ट मॅनेजमेंट कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. 2023 या वर्षात रेस इको चेन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरची किंमत 200 रुपयेवरून वाढून 400 रुपये किमतीवर पोहचली आहे. 6 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 406 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. Race Eco Chain Share Price
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेस इको चेन कंपनीचे शेअर्स 1.72 टक्के घसरणीसह 390.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी रेस इको चेन कंपनीचे शेअर्स 0.47 टक्के घसरणीसह 389.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
स्टॉकची कामगिरी :
मागील एका महिन्यात रेस इको चेन कंपनीचे शेअर्स 260 रुपयेवरून वाढून 400 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या काळात गुंतवणूकदारांनी तब्बल 60 टक्के परतावा कमावला आहे. मागील सहा महिन्यांत रेस इको चेन कंपनीच्या स्मॉल कॅप स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 35 टक्के परतावा कमावून दिला आहे.
YTD आधारे या कंपीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. मागील पाच वर्षांत रेस इको चेन कंपनीच्या शेअरची किंमत 45 रुपयेवरून वाढून 400 रुपये किमतीवर पोहोचले होते. याकाळात गुंतवणूकदारांनी तब्बल 750 टक्के परतावा कमावला होता.
कंपनीचे तिमाही निकाल :
सप्टेंबर 2023 तिमाहीत रेस इको चेन कंपनीची निव्वळ विक्री 78.88 कोटी रुपये होती. मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या विक्रीमध्ये 60.4 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. त्याच वेळी मागील तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 22 टक्क्यांच्या घसरणीसह 0.22 कोटी रुपये नोंदवला गेला होता.
याच तिमाहीत रेस इको चेन कंपनीचा EBITDA 1.22 कोटी रुपये नोंदवला गेला होता. रेस इको चेन ही कंपनी मुख्यतः AI आणि Blockchain द्वारे कचरा व्यवस्थापन करण्याची सेवा प्रदान करते. ही कंपनी कचऱ्याच्या संकलन आणि त्याची विल्हेवाट करण्याच्या सर्व सुविधा प्रदान करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Multibagger Stocks Race Eco Chain Share Price NSE 11 December 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS