6 January 2025 8:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स रॉकेट वेगाने वाढणार? कंपनीच्या 'या' घोषणेनंतर तज्ज्ञांनी काय म्हटले?

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून टाटा पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत होती. मात्र आज या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. नुकतीच टाटा पॉवर कंपनीने घोषणा केली होती की, टाटा पॉवर कंपनीच्या TPEVCSL या उपकंपनीने IOC कंपनीसोबत करार केला आहे.

हा करार ईव्ही चार्जिंग सोल्यूशन संबंधित करण्यात आला आहे. टाटा कंपनीच्या उपकंपनीने IOC कंपनी सोबत भारतात 500 पेक्ष अधिक ईव्ही चार्जिंग पॉइंट्स बसवण्यासाठी हा करार केला आहे. आज मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 0.76 टक्के घसरणीसह 331.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

1) तज्ञांच्या मते आर्थिक वर्ष 2027 पर्यंत टाटा पॉवर कंपनीचे उत्पन्न, EBITDA आणि नफा दुप्पट वाढण्याची अपेक्षा आहे. यामध्ये कंपनीच्या स्वच्छ आणि हरित ऊर्जा उद्योगाचा EBITDA 79 टक्के पर्यंत वाढवण्याची शक्यता आहे.

2) आर्थिक वर्ष 2024-27 पर्यंत टाटा पॉवर कंपनीने 60,000 कोटी रुपये कॅपेक्सची योजना आखली आहे. यापैकी 45 टक्के वाटा अक्षय ऊर्जेवर खर्च केला जाईल. 15 टक्के वाटा पंप केलेल्या हायड्रोजनवर खर्च केला जाईल. आणि 17 टक्के वाटा T&D वर आणि 17 टक्के वाटा T&D च्या पर्यायी वाढीवर खर्च करण्याची योजना आखण्यात आली आहे. तर 5 टक्के रक्कम कोळशापासून निर्माण होणाऱ्या ऊर्जा निर्मितीवर खर्च केला जाणार आहे.

3) 2028 पर्यंत टाटा पॉवर कंपनीचा व्यवसाय 24×7 अक्षय ऊर्जा आणि स्टोरेज पोर्टफोलिओ वाढवेल.

4) टाटा पॉवर कंपनीने आपल्या व्यवसाय विस्तार योजनेत प्रत्येकी 2,800 मेगावॅट क्षमतेचे 2 ब्राउनफिल्ड पंप केलेले हायड्रो स्टोरेज प्रकल्प सुरू करण्याची योजना आखली आहे.

5) 2027 पर्यंत टाटा पॉवर कंपनी आपली विद्यमान 5.5 GW क्षमता 15 GW वर नेणार आहे. आणि 2030 पर्यंत ही क्षमता 20 GW पर्यंत नेणार आहे. यासह टाटा पॉवर कंपनी 2045 पर्यंत स्वच्छ आणि हरित ऊर्जा पातळी 100 टक्केवर नेणार आहे.

6) टाटा पॉवर कंपनी आपल्या 50,890 Ckt Km ट्रान्समिशन लाइनचे काम करत आहे. पुढील 5 वर्षात कंपनी 4.3 लाख MVA उपकेंद्र उभारण्याची तयारी करत आहे.

7) टाटा पॉवर कंपनी पुढील काही काळात आपला तृतीय पक्ष EPC व्यवसाय कमी करण्याची शक्यता आहे. तर पुढील 6-24 महिन्यांत टाटा पॉवर कंपनी 18,700 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर पूर्ण करेल.

8) सौर पंपांवर मिळणारा अल्प परतावा आणि भारत सरकारच्या कुसुम योजनेतील संथ प्रगती टाटा पॉवर कंपनीने त्याकडे विशेष लक्ष दिले नाहीये.

9) टाटा कंपनीच्या मुंद्रा थर्मल प्लांटबाबत, कंपनीच्या मते, आर्टिकल 11 वारंवार लागू करणे ही कंपनीसाठी चांगली बातमी नाही.

10) टाटा पॉवर कंपनीने आर्थिक वर्ष 2028 पर्यंत 10000 सार्वजनिक चार्जर आणि 2 लाख होम चार्जर्स स्टेशन उभारण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. यामध्ये कंपनी होम चार्जिंग, पब्लिक चार्जिंग, फ्लीट चार्जिंग आणि बस चार्जिंग स्टेशन देखील उभारणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price NSE 12 December 2023.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x