23 April 2025 1:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट - NSE: YESBANK NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर देऊ शकतो मोठा परतावा, या कंपनीला मोठा भविष्यकाळ - NSE: NTPCGREEN Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: JIOFIN Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार; मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टार्गेट जाणून घ्या - NSE: SUZLON BEL Share Price | शेअर असावा तर असा, तब्बल 1,33,786 टक्के परतावा, संयम पळणारे श्रीमंत झाले - NSE: BEL Bonus Share News | अशी संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: UEL
x

Yes Bank Share Price | स्वस्त येस बँक शेअर्स पुन्हा मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, किती परतावा मिळणार?

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7.7 टक्के वाढीसह 21.82 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज या शेअरमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. येस बँकेने नुकताच 4,234 कोटी रुपये मूल्याच्या NPA ची विक्री करण्याची योजना व्यक्त केली आहे.

14 डिसेंबर 2022 रोजी येस बँक शेअर 27.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 23 ऑक्टोबर 2023 रोजी येस बँक स्टॉक 14.10 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी येस बँक स्टॉक 0.47 टक्के घसरणीसह 21.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, येस बँकेने नुकताच 4,234 कोटी रुपये मूल्याची NPA विक्रीसाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्टसाठी बोली मागवली आहे. येस बँकेने 3,092 कोटी रुपये मूल्याचे कॉर्पोरेट NPA अवरोधित केले आहेत, यात 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत 3,073.66 कोटी रुपये मूल्याचे निधी-आधारित देय आणि 17.83 कोटी रुपये मूल्याचे नॉन फंड आधारित थकबाकी सामील आहे.

मागील दीड महिन्यात येस बँक स्टॉक 54 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. मात्र हा स्टॉक अजून देखील 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 14 टक्के कमजोर आहे. शेअर बाजारातील तज्ञ येस बँक स्टॉकच्या खरेदीबाबत सकारात्मक आहेत.

तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉकचा दैनिक DMI आणि रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स काउंटर मजबूत तेजीचे संकेत देत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी येस बँक स्टॉकवर 26 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तज्ञांनी हा स्टॉक 21-22 रुपये या श्रेणीमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर 19 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE 13 December 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या