25 November 2024 11:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदी वाढली - NSE: RVNL Horoscope Today | विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायी; जीवनात नव्या मार्गांकडे होईल वाटचाल, पहा तुमचे राशिभविष्य Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN
x

Radico Khaitan Share Price | करोडपती बनवणारा दारू कंपनीचा शेअर पुन्हा देईल मोठा परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटलं?

Radico Khaitan Share Price

Radico Khaitan Share Price | रॅडिको खेतान कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रॅडिको खेतान कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या घसरणीसह 1635 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. रॅडिको खेतान कंपनीचे एकूण बाजार भांडवल 81,870 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1885 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 965 रुपये होती.

शेअर्स बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 1650 रुपये किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी रॅडिको खेतान स्टॉक 4.52 टक्के वाढीसह 1,688.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारानी सध्या रॅडिको खेतान कंपनीचे शेअर्स 1670 रुपये किमतीवर खरेदी केले पाहिजे. गुंतवणूक करताना तज्ञांनी स्टॉकवर 1625 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते रेडिको खेतान स्टॉक दैनिक चार्टवर ब्रेकआउट देत आहे. स्टॉकचा MACD तेजीचा क्रॉसओव्हर दर्शवत असून RSI सिग्नल देखील तेजीचे संकेत देत आहे. तज्ञांच्या मते, रॅडिको खेतान कंपनीचे शेअर्स 1790 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

मागील पाच दिवसात रॅडिको खेतान स्टॉक 3.30 टक्क्यांनी घसरला होता. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 17 टक्के नफा मिळवून दिला आहे. मागील 6 महिन्यांत रॅडिको खेतान कंपनीच्या शेअर्सची किंमत 38 टक्के वाढली आहे. तर 2023 या वर्षात कंपनीचे शेअर्स तब्बल 60 टक्के वाढले आहे.

5 जानेवारी रोजी या कंपनीचे शेअर्स 1013 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 27 मार्च 2020 रोजी Radico खेतान स्टॉक 262 रुपये किमतीवर पडला होता. या किमतीवरून शेअर्सची किंमत 500 टक्के वाढली आहे. 20 जून 2003 रोजी रॅडिको खेतान कंपनीचे शेअर्स 7.62 रुपये या नीचांक किंमत पातळीवरून 21,411 टक्के वाढले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Radico Khaitan Share Price NSE 13 December 2023.

हॅशटॅग्स

#Radico Khaitan Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x