27 April 2025 11:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
e Filing Income Tax | पगारदारांनो, नवीन टॅक्स प्रणालीमध्ये 75000 रुपयांची स्टॅंडर्ड डिडक्शन मिळणार नाही? मोठी अपडेट LIC Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या सरकारी फंडात, अनेक पटीने पैसा परतावा मिळतोय, सेव्ह करून ठेवा EPFO Passbook | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, EPF प्रक्रियेत मोठे बदल, हक्काच्या पैशाबाबत अपडेट Horoscope Today | 28 एप्रिल 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 28 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mishtann Foods Share Price | पेनी स्टॉक 52-आठवड्यांच्या जवळ पोहोचला, तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - BOM: 539594 GTL Share Price | पेनी स्टॉकने लोअर सर्किट हिट केला, हा स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA
x

तिवरे धरणाचे ठेकेदार सेना आमदार सदानंद चव्हाणांविरुद्ध गुन्हा दाखल करा, विरोधकांची मागणी

Shivsena, Uddhav Thackeray, Aaditya Thackeray, Tivare Dam Scam, Shivsena party

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. हे धरण बांधलेली खेमराज कन्ट्रक्शन कंपनी आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. महत्त्वाचं म्हणजे खेमराज कन्ट्रशन कंपनी चिपळूणचे शिवसेना आमदार सदानंद चव्हाण आणि त्यांच्या बंधूची आहे. धरणाला लागलेल्या गळतीप्रकरणी आता खेमराज कन्ट्रक्शन कंपनी जवाबदार असल्याचे आरोप होत आहे.

पण हे सर्व आरोप आमदार सदानंद चव्हाण यांनी फेटाळून लावलेत. तिवरे धरण मातीचे बांधण्यात आले होते. तब्बल २० वर्षानंतर धरण बांधलेल्या कंपनीला कसं काय दोषी धरलं जावू शकतं, असा सवाल सदानंद चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. शिवाय आपण लोकप्रतिनिधी असल्यानं आपल्याला गुंतवलं जात असल्याचा आरोप सदानंद चव्हाण यांनी केला. खेमराज कनस्ट्रकशन यात दोषी नसल्याचा दावा यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी केला. शिवाय अधिकाऱ्यांनी या धरणाच्या डागडुजीसंदर्भात योग्य ती पावले उचलायला हवी होती असंही त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, चिपळूणचे शिवसेना आमदार सदानंद चव्हाण हे तिवरे धरणाचे ठेकेदार असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच धरण फुटल्यामुळे झालेले मृत्यू हे सरकारच्या अनास्थेचे बळी असून सरकारवर ३०२चा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. मागील तीन-चार दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळं ओसंडून वाहणाऱ्या तिवरे धरणाला भगदाड पडून ते फुटले. यामुळे धरणाच्या परिसरातील गावे पाण्याखाली गेल्याने हाहाकार माजला आहे. या दुर्घटनेत १३ घरे पाण्याखाली गेली तर २४ जण बेपत्ता आहेत.

दरम्यान शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण यांच्या कंपनीने धरणाचे बांधकाम केले होते. त्यामुळे आमदारांसह संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच नैतिक जबाबदारी घेऊन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी राजीनामा द्यावा असेही वडेट्टीवार म्हणाले. तिवरे धरणाला तडे गेल्याबाबत गावकरयांनी तक्रार केली होती, अशी कबुली गिरीष महाजन यांनी दिली आहे. तसेच याप्रकरणी चौकशीचे आदेशही गिरीष महाजन यांनी दिल्याचे सांगितले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या