22 November 2024 11:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Senco Gold Share Price | सोनं नव्हे सोन्याच्या कंपनीचा शेअर पैसा वाढवतोय, 5 महिन्यात 145% परतावा, पुढे झटपट 21% मिळेल

Senco Gold Share Price

Senco Gold Share Price | 2023 या वर्षात अनेक कंपन्यांचे IPO शेअर बाजारात सूचिबद्ध झाले. आणि यातील बहुतेक कंपन्यानी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. सेन्को गोल्ड कंपनीचा आयपीओ देखील असाच होता. सेन्को गोल्ड कंपनीचे शेअर्स 14 जुलै 2023 रोजी शेअर बाजारात 405.3 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.

या कंपनीचे शेअर्स 317 रुपये या आपल्या IPO इश्यू किमतीच्या तुलनेत 28 टक्के वाढीसह सूचीबद्ध झाले होते. अवघ्या पाच महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने 823.25 रुपये ही आपली सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी सेन्को गोल्ड स्टॉक 1.51 टक्के घसरणीसह 749 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

सध्या सेन्को गोल्ड कंपनीचे शेअर्स आपल्या IPO किमतीच्या तुलनेत 145 टक्के प्रीमियम वाढीसह ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 920 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. सेन्को गोल्ड अँड डायमंड्स या कंपनीची उत्पादने विविध ब्रँड अंतर्गत, शोरुम, फ्रेंचाइज्ड स्टोअर्स आणि विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात विकली जातात.

नुकताच देशांतर्गत ब्रोकरेज फर्म एसबीआय सिक्युरिटीजने सेन्को गोल्ड कंपनीच्या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 920 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे. ही टार्गेट किंमत सध्याच्या किमतीच्या तुलनेत 21.72 टक्के अधिक आहे.

सेन्को गोल्ड कंपनीला ज्वेलरी क्षेत्रात व्यवसाय करण्याचा 5 दशकांपेक्षा अधिक अनुभव आहे. त्यामुळे कंपनीने आपल्या ग्राहकांमध्ये विश्वास आणि पारदर्शकता निर्माण केली आहे. ही कंपनी भारताच्या पूर्व भागात सर्वात मोठी संघटित ज्वेलरी किरकोळ कंपनी मानली जाते. स्टोअरच्या संख्येनुसार आणि पूर्व भारतातील ज्वेलरी किरकोळ विक्रेत्यांमध्ये सेन्को गोल्ड कंपनी अव्वल आहे.

सेन्को गोल्ड कंपनीचा मार्जिन अॅक्रिटिव्ह स्टड रेशो आर्थिक वर्ष 2018 मध्ये 5 टक्के वरून वाढून 2023 मध्ये 7 टक्केवर पोहचला आहे. आर्थिक वर्ष 2024 पर्यंत कंपनीचे मिश्र व्यवसाय गुणोत्तर 11.4 टक्केवारी जाण्याची शक्यता आहे. तर पुढील 3-4 वर्षात हे प्रमाण 15 टक्के पर्यंत पोहोचू शकते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Senco Gold Share Price NSE 16 December 2023.

हॅशटॅग्स

#Senco Gold Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x