5 November 2024 2:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News
x

Happy Forgings IPO | मार्ग श्रीमंतीचा! पहिल्याच दिवशी कमीत कमी 50 टक्के परतावा मिळेल, IPO उद्या खुला होणार

Happy Forgings IPO

Happy Forgings IPO | सध्या भारतीय शेअर बाजारात एकामागून एक कंपन्याचे IPO लाँच होत आहेत. मागील 2 महिन्यापासुन शेअर बाजारात IPO चा जणू पुरच आला आहे. या आठवड्यात देखील अनेक कंपन्यांचे आयपीओ लाँच होणार आहेत. त्यापैकी एक आहे, हॅपी फोर्जिंग कंपनीचा आयपीओ.

हॅपी फोर्जिंग कंपनीचा IPO 19 डिसेंबर ते 21 डिसेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या कंपनीचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहेत. सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर हॅपी फोर्जिंग आयपीओ मध्ये पैसे लावा.

हॅपी फोर्जिंग कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 808 ते 850 रुपये दरम्यान निश्चित केली आहे. या कंपनीने आपल्या एका लॉटमध्ये 17 शेअर्स ठेवले आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 14,450 रुपये जमा करावे लागणार आहे. किरकोळ गुंतवणूकदार कमाल 13 लॉट खरेदी करू शकतात.

हॅप्पी फोर्जिंग कंपनी आपल्या IPO चे शेअर्स 22 डिसेंबर 2023 रोजी वाटप करेल. तर 27 डिसेंबर 2023 रोजी कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध केले जातील. हॅपी फोर्जिंग्स कंपनीचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 420 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, हॅपी फोर्जिंग कंपनीचे शेअर्स 1300 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. म्हणजेच स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तब्बल 50 टक्के नफा मिळेल. हॅपी फोर्जिंग कंपनी आपल्या आयपीओच्या माध्यमातून 400 कोटी रुपये मूल्याचे 72 लाख शेअर्स खुल्या बाजारात वाटप करणार आहे.

हॅपी फोर्जिंग कंपनीने आपल्या IPO चा 50 टक्के कोटा पात्र संस्थात्मक गुंतवणुकदारांसाठी राखीव ठेवला आहे. तर कंपनीने 35 टक्के कोटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे. आणि 15 टक्के कोटा कंपनीने एनआयआयसाठी राखीव ठेवला आहे. सध्या कंपनीत प्रवर्तकांनी एकूण 88.24 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Happy Forgings IPO GMP 18 December 2023.

हॅशटॅग्स

Happy Forgings IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x