18 November 2024 5:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA
x

Yes Bank Share Price | 2 महिन्यात 61% परतावा देणाऱ्या येस बँक शेअर्समध्ये काय चाललंय? व्हॅल्यू बाय आहे की मोमेंटम ट्रॅप?

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 23 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या बँकिंग स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मागील एक महिन्यापासून येस बँकेच्या शेअरमध्ये सातत्याने तेजी पाहायला मिळत होती.

खासगी क्षेत्रातील येस बँक लिमिटेडचे शेअर्स जवळपास दोन महिन्यांत 61 टक्क्यांनी वधारले आहेत. 23 ऑक्टोबर 2023 रोजी 14.10 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचलेला बँकिंग शेअर गेल्या सत्रात 22.78 रुपयांवर बंद झाला आणि दोन महिन्यांत 61.56% वाढ झाला. येस बँकेचा शेअर सोमवारी 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर 23 रुपयांवर पोहोचला, तर बीएसईवर तो 21.93 रुपयांवर बंद झाला होता. नंतर ते 3.88 टक्क्यांनी वधारून 22.78 रुपयांवर बंद झाले.

मात्र आज गुंतवणूकदारांनी नफा वसुली केली आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, येस बँकेचे शेअर्स पुढील काळात 28 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आज मंगळवार दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी येस बँक स्टॉक 2.41 टक्के घसरणीसह 22.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

तज्ज्ञांच्या दृष्टीने:
तांत्रिकतेच्या दृष्टीने, येस बँकेच्या शेअर्सचा सापेक्ष सामर्थ्य निर्देशांक (आरएसआय) 78.5 आहे, जे दर्शविते की हा शेअर ओव्हरबायड झोनमध्ये ट्रेड करत आहे. येस बँकेचे शेअर्स 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरीपेक्षा जास्त व्यवहार करत आहेत.

तीन महिन्यांत हा शेअर २२.७४ टक्क्यांनी वधारला आहे. दोन महिन्यांतील ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून हा शेअर ६१ टक्क्यांनी वधारला असल्याने हा शेअर व्हॅल्यू बाय आहे की मोमेंटम ट्रॅप, असा अंदाज गुंतवणूकदार बांधत आहेत.

काही तज्ज्ञांच्या मते
येस बँकेच्या शेअर्सवर लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, येस बँक शेअरच्या मूलभूत आणि तांत्रिक बाबी मजबूत आहेत. येस बँक स्टॉक चार्ट पॅटर्नवर देखील मजबूत वाढीचे संकेत देत आहे. पुढील काही दिवसात येस बँकेचे शेअर्स 25 ते 28 रुपये किंमत स्पर्श करू शकतात, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. तज्ञांच्या मते, “2018 च्या आर्थिक संकटानंतर येस बँक स्टॉक आता मजबूत स्थितीत आला आहे. येस बँकेकडे सध्या 75 लाखांपेक्षा जास्त ग्राहक वर्ग आहे.

सध्या येस बँकेकडे एकूण 3.54 लाख कोटीची मालमत्ता आहे. UPI पेमेंटच्या आकडेवारीत येस बँक भारतात पहिल्या क्रमांकाची बँक मानली जाते. सध्या येस बँक भारतात आपल्या 1192 शाखाद्वारे व्यवसाय करत आहे. मागील एका महिनाभरात येस बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 13 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत हा येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 40 टक्क्यांपेक्षा जास्त नफा मिळवून दिला आहे. येस बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 14.10 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE 19 December 2023.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(193)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x