22 November 2024 3:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN
x

Suzlon Share Price | अल्पावधीत मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सची खरेदी करण्याचा टॉप ब्रोकरेजचा सल्ला, कारण?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | चालू आठवड्यात भारतीय शेअर बाजारात कमालीची उलथापालथ पाहायला मिळत आहे. तेजीत वाढणाऱ्या शेअर बाजारात आता प्रचंड मोठ्या प्रमाणात नफा वसुली पाहायला मिळत आहे. अनेक कंपनीचे शेअर्स जे गुंतवणूकदारांना कमालीचा परतावा देत होते, ते आज विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. असाच एक स्टॉक आहे, सुझलॉन एनर्जी कंपनीचा.

2023 या वर्षाच्या सुरुवातीला सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स गुंतवणुकीसाठी धोकादायक मानले जात होते. मात्र याच कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. आज मंगळवार दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 2.11 टक्के घसरणीसह 37.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मार्च 2023 मध्ये 7 रुपये किमतीच्या खाली ट्रेड करत होते. नंतर मे 2023 पर्यंत हा स्टॉक 8.70 रुपये किमतीवर पोहचला होता. त्यानंतर सलग 6 महिन्यांत शेअरने प्रचंड तेजीत गुंतवणूकदारांचे पैसे वेगाने वाढवले आहेत.

17 नोव्हेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 44.20 रुपये या आपल्या उच्चांक किंमती पातळीवर पोहचले होते. शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 38.54 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मार्च 2023 पासून आतापर्यंत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 500 टक्क्यांपेक्षा जास्त नफा मिळवून दिला आहे.

IIFL सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी काही महिन्यांपूर्वी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. तज्ञांच्या मते, कंपनीचे अंतर्निहित व्यवसाय खूप मजबूत आहेत. सुझलॉन एनर्जी ही कंपनी पवन ऊर्जा क्षेत्रात खूप मोठा व्यवसाय करत आहे.

मागील काही वर्षात कंपनीच्या अंतर्निहित व्यवसायात देखील पूर्ण परिवर्तन पाहायला मिळाले आहे. कंपनीची आर्थिक परिस्थिती बदलली असून आणि स्टॉक परत आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीच्या दिशेने मार्गक्रमण करताना दिसत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE 19 December 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(261)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x