23 November 2024 3:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Sarveshwar Foods Vs Mishtann Foods Share | शेअरची किंमत 5 रुपये! यापूर्वी 15 पटीने गुंतवणुकीचा पैसा वाढवला, खरेदी करणार?

Sarveshwar Foods Vs Mishtann Foods Share

Sarveshwar Foods Vs Mishtann Foods Share | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सर्वेश्वर फूड्स कंपनीचे शेअर 4.17 टक्क्यांच्या वाढीसह 5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सर्वेश्वर फूड्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 484 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 157 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 4 रुपये होती. मागील 5 दिवसांत सर्वेश्वर फूड्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 8 टक्के नफा मिळवून दिला आहे.

सर्वेश्वर फूड्स कंपनीच्या शेअर्सने नुकताच आपल्या शेअरधारकांना बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा लाभ दिला आहे. सर्वेश्वर फूड्स लिमिटेड या कंपनीची स्थापना 2004 साली जम्मू आणि काश्मीरमध्ये झाली होती. ही कंपनी मुख्यतः बासमती तांदळाच्या उत्पादन, व्यापार आणि निर्यात संबंधित व्यवसाय करते. आज मंगळवार दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी सर्वेश्‍वर फूड्स कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 5.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

सर्वेश्‍वर फूड्स लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना 65.2544 कोटी बोनस शेअर्स मोफत वाटप केले होते. तर कंपनीने आपल्या शेअर धारकांना स्टॉक स्प्लिटचा देखील लाभ दिला आहे. सर्व्हेश्वर फूड्स कंपनीचे शेअर्स 9 एप्रिल 2020 रोजी 8.45 पैशांवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीचे शेअर्स 5.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या काळात सर्वेश्‍वर फूड्स कंपनीच्या गुंतवणूकदारांचे पैसे 14 पट अधिक वाढले आहेत.

सर्वेश्‍वर फूड्स कंपनीने शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट लाभ देण्याची घोषणा केल्यानंतर, कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट हीट करत होते. मागील 3 वर्षात, सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समे आपल्या गुंतवणूकदारांना 8 रुपये किमतीवरून 116 रुपये या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीपर्यंत 15 पट नफा मिळवून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sarveshwar Foods Vs Mishtann Foods Share 19 December 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x