18 November 2024 11:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News
x

Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर खूप संथगतीने परतावा देतोय, गुंतवणूकदारांनी काय करावे?

Infosys Share Price

Infosys Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. सध्या भारतीय शेअर बाजार आपल्या विक्रमी उच्चांकावर असताना देशात कोरोना व्हायरसने पुन्हा डोके वर काढले आहे. अशा काळात गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसात शेअर बाजार अस्थिर असताना रिलायन्स इंडस्ट्री कंपनीच्या शेअरमध्ये मोठी रिकव्हरी पाहायला मिळाली आहे.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी-50 इंडेक्स आपल्या नीचांक पातळीपासून 125 अंकांच्या वाढीसह ट्रेड करत होता. तर बँक निफ्टी देखील 250 अंकांच्या वाढीसह ट्रेड करत होता. शेअर बाजारातील मिडकॅप निर्देशांकात मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळाली आहे. तर एफएमसीजी कंपनीच्या शेअर्समध्ये देखील सर्वाधिक खरेदी पाहायला मिळाली आहे. निफ्टी इंडेक्सचा एफएमसीजी निर्देशांक दीड टक्क्याच्या वाढीसह ट्रेड करत होता. तर नेस्ले कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह ट्रेड करत होते.

शेअर बाजारात तेजी असताना गुंतवणूकदारांनी इन्फोसिस कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. मात्र आता विक्रीचा दबाव वाढल्याने अनेक गुंतवणुकदार इन्फोसिस स्टॉक विकून बाहेर पडत आहेत. आज बुधवार दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी इन्फोसिस कंपनीचे शेअर्स 0.28 टक्के वाढीसह 1,562.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात इन्फोसिस कंपनीच्या शेअर्सची किंमत फक्त 2-3 टक्केच वाढली आहे.

ज्युबिलंट फूड, कोलगेट आणि मॅरिको या कंपनीच्या शेअर्समध्येही जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारातील आयटी आणि वाहन क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळाली होती.

शेअर बाजारातील अनेक गुंतवणूकदारांनी CIPLA कंपनीचे शेअर्स देखील खरेदी केले होते. मात्र आता  गुंतवणूकदार शेअर बाजारात विक्रीचा दबाव असताना सिप्ला कंपनीचे शेअर्स विकून बाहेर पडत आहेत. शेअर बाजारातील अनेक तज्ञ सिप्ला कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावण्याचा सल्ला देत आहेत. कारण तज्ञांना असे वाटते की, हा स्टॉक पुढील काही दिवसात 5-6 टक्के अधिक वाढू शकतो. आज बुधवार दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी सिप्ला स्टॉक 0.49 टक्के वाढीसह 1,243.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Infosys Share Price NSE 20 December 2023.

हॅशटॅग्स

#Infosys Share Price(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x