13 December 2024 2:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO Horoscope Today | काही वेळातच 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जीवनात नवीन संधी प्राप्त होतील तर, काहींना पैसा HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
x

Stocks To Buy | होय! पेटीएम शेअर अल्पावधीत देईल 48 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला फायद्याचा सल्ला

Stocks To Buy

Stocks To Buy | भारतीय शेअर बाजारात सध्या जबरदस्त अस्थिरता निर्माण झाली आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना चांगली कमाई करून देत आहेत. या स्टॉकमध्ये पेटीएम कंपनीचे नाव देखील सामील आहे. ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीने आपल्या नवीन अहवालात पेटीएम कंपनीच्या शेअरची टार्गेट प्राइस 48 टक्के वाढवली आहे.

तज्ञांच्या मते पेटीएम कंपनीचे शेअर्स पुढील काही महिन्यांत 900 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आज बुधवार दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 1.08 टक्के घसरणीसह 616 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

पेटीएम कंपनीच्या व्यवस्थापन मंडळासोबत चर्चा करून मॅक्वेरी फर्मने आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. आरबीआयने आपले ग्राहक कर्ज देण्याबाबतचे नियम अधिक कडक केल्यानंतर पेटीएम कंपनीने आपल्या ग्राहकांना लघु कर्ज न देण्याची घोषणा केली होती.

मॅक्वेरी फर्मने म्हंटले आहे की, पेटीएम कंपनी आपल्या कर्ज विभागाच्या किंवा पोस्टपेड सेवाच्या मालमत्तेच्या घसरणीबाबत चिंतित नाही. पेटीएम कंपनीच्या पोस्ट पेड कर्जाचा कालावधी कमी असून याचा कंपनीच्या व्यवसायावर फारसा नकारात्मक परिणाम पडणार नाही. कारण पेटीएम कंपनीने आपल्या पोस्ट पेड कर्जाचा कालावधी फक्त 30 दिवस ठेवला आहे.

डिसेंबर 2023 च्या दुसऱ्या आठवड्यात पेटीएम कंपनीने आपले 50000 रुपये कर्ज देण्याची सेवा बंद केली होती. आरबीआयने आपले ग्राहक कर्ज नियम कठोर केल्याने पेटीएम कंपनीला हे पाऊल उचलावे लागले. आरबीआयच्या या कारवाईमुळे अनेक एनबीएफसीं कंपनीने आपल्या लघु असुरक्षित कर्जाची सेवा बंद केली आहे.

यानंतर पेटीएम कंपनी आता फक्त पोस्ट पेड कर्जावर लक्ष केंद्रित करत आहे. म्हणजेच व्यापारी बँका आणि NBFC कंपनीसोबत भागीदारी करून पेटीएम कंपनी आपल्या व्यवसायात सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे.

पेटीएम स्टॉकवर तज्ञांनी दिलेल्या लक्ष किमती :
* सीएलएसए : 925 रुपये
* जेपी मॉर्गन : 900 रुपये
* गोल्डमन सॅक्स : 840 रुपये
* जेफरीज : 1050 रुपये
* बर्नस्टीन : 950 रुपये

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy call on Paytm Share Price 20 December 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x