25 November 2024 3:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | GTL पेनी शेअर तेजीने परतावा देणार, रिलायन्स कंपनी कनेक्शन, रॉकेट तेजीचे संकेत - BSE: 513337 Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News
x

Integra Essentia Share Price | 6 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार! अल्पावधीत 2000% परतावा, फ्री बोनस शेअर्स देणार

Integra Essentia Share Price

Integra Essentia Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. दरम्यान LIC कंपनीची मोठी गुंतवणूक असलेल्या इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 11 टक्क्याच्या वाढीसह ट्रेड करत होते. त्यानंतर शेअरमध्ये आणखी खरेदी वाढली आणि इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 15 टक्क्यांच्या वाढीसह 6.30 रुपये किमतीवर पोहचले होते.

इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 276 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 9.45 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 5.30 रुपये होती. नुकताच इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड कंपनीने M/s Brutus Beverages Private Limited कंपनीमधील एकूण 51 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहेत. आज गुरूवार दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.33 टक्के वाढीसह 6.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड कंपनीने जाहीर केलेल्या माहितीनुसार बीपीएल क्षेत्रात व्यवसाय विस्तार करण्यासाठी कंपनीने 10 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. BBPL आगामी काळात मद्य तसेच थंड पेय उद्योगात मोठ्या व्यावसायिक संभावनांवर काम करत आहे. इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड कंपनीने आपल्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये नवीन मद्य आधारित उत्पादने जोडली आहेत, ज्यात बिअर आणि व्हिस्की देखील सामील करण्यात आले आहेत.

इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड कंपनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीला 18 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड कंपनी आपल्या पात्र शेअरधारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर देखील वाटप करणार आहे.

रेकॉर्ड तारीख पर्यंत ज्या लोकांकडे या कंपनीचे शेअर्स असतील, त्यांना कंपनी मोफत बोनस शेअर्स देईल. मागील 3 वर्षात इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2000 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील 3 वर्षांत, इंटेग्रा एसेंशिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 0.33 पैशांवरून वाढून 6 रुपये किमतीवर पोहचली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Integra Essentia Share Price BSE 21 December 2023.

हॅशटॅग्स

#Integra Essentia Share Price(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x