15 December 2024 12:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Varun Beverages Share Price | या शेअरने अल्पावधीत 1100% परतावा दिला, आता 'या' बातमीने शेअर्स खरेदीला ऑनलाईन झुंबड

Varun Beverages Share Price

Varun Beverages Share Price | वरुण बेव्हरेजेस कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 18 टक्के वाढीसह 1,380.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे. पेप्सीको या जगातील सर्वात मोठ्या कंपनीची फ्रँचायझी चालवणाऱ्या बॉटलर वरुण बेव्हरेजेस लिमिटेड कंपनीने मंगळवारी माहिती दिली की, कंपनीने दक्षिण आफ्रिकातील पेय कंपनी बेव्हको आणि त्याच्या पूर्ण मालकीच्या उपकंपन्यांचे अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला आहे.

या वृत्तानंतर बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वरुण बेव्हरेजेस स्टॉक तेजीत आला होता. आज गुरूवार दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी वरुण बेव्हरेजेस स्टॉक 3.56 टक्के वाढीसह 1,298 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

वरुण बेव्हरेजेस कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही डील 1,320 कोटी रुपये एंटरप्राइझ मूल्यावर झाली आहे. या डीलमुळे वरुण बेव्हरेजेस कंपनीला आफ्रिकन बाजारपेठेत व्यवसाय विस्तार करण्यास मदत होईल. बेव्हको या कंपनीकडे दक्षिण आफ्रिका, लेसोथो आणि इस्वाटिनीमधील पेप्सिको कंपनीची फ्रँचायझी आहे. आणि या कंपनीचे नामिबिया आणि बोत्सवाना मध्ये वितरण अधिकार आहेत. ही डील 31 जुलै 2024 पूर्वी पूर्ण होण्याची शक्यता आहे.

आर्थिक वर्ष 2023 मध्ये बेव्हको कंपनीने 1590 कोटी रुपये निव्वळ महसूल संकलित केला होता. मागील पाच दिवसांत वरुण बेव्हरेजेस कंपनीच्या शेअरची किंमत 20 टक्के वाढली आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील 6 महिन्यांत वरुण बेव्हरेजेस स्टॉकची किंमत 62 टक्के वाढली आहे. तर YTD आधारे गुंतवणूकदारांनी तब्बल 97 टक्के नफा कमावला आहे. मागील पाच वर्षांत वरुण बेव्हरेजेस कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1100 टक्के पेक्षा अधिक नफा मिळवून दिला आहे. या काळात कंपनीच्या शेअर्सची किंमत 109 रुपयेवरून वाढून 1380.45 रुपये किमतीवर पोहचली आहे. वरुण बेव्हरेजेस कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,69,398.14 कोटी रुपये आहे.

ब्रोकरेज फर्म CLSA ने वरुण बेव्हरेजेस स्टॉकवर “बाय” रेटिंग देऊन स्टॉक 1,419 रुपये टारगेट प्राइस साठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जेफरीजने वरुण बेव्हरेजेस स्टॉकवर 1,100 रुपये टारगेट प्राइस निश्चित केली आहे. तर मोतीलाल ओसवाल फर्मच्या मते, Bevco चे अधिग्रहण करणे हे वरुण बेव्हरेजेस कंपनीसाठी EPS-accretive आहे. हा अधिग्रहणमुळे वरुण बेव्हरेजेस कंपनीची आफ्रिकेत व्यावसायिक उपस्थिती वाढेल. म्हणून ब्रोकरेज फर्मने वरुण बेव्हरेजेस कंपनीच्या शेअरवर 1,285 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Varun Beverages Share Price NSE 21 December 2023.

हॅशटॅग्स

#Varun Beverages Share Price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x