15 December 2024 12:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Motisons Jewellers IPO | लॉटरी लागणार! फक्त 55 रुपयांचा IPO शेअर पहिल्याच दिवशी देईल 141% परतावा, GMP ने संकेत

Motisons Jewellers IPO

Motisons Jewellers IPO | मोतीसन्स ज्वेलर्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी अप्रतिम प्रतिसाद दिला आहे. मोतीसन्स ज्वेलर्स कंपनीच्या आयपीओला सबस्क्रिप्शनच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सर्वच श्रेणींमध्ये अपेक्षेपेक्षा चांगली बोली प्राप्त झाली आहे.

मोतीसन्स ज्वेलर्स कंपनीचा IPO एकूण 173.13 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. मोतीसन्स ज्वेलर्स कंपनीचा IPO ओपनिंगच्या दुसऱ्या दिवशी 51.50 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. रिटेल आणि एनआयआयसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा पहिल्याच दिवशी पूर्णपणे सबस्क्राइब झाला होता. IPO ओपनिंगच्या पहिल्याच दिवशी हा IPO 15.02 पट अधिक सबस्क्राईब झाला होता.

मोतीसन्स ज्वेलर्स कंपनीचा IPO 18 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी अँकर गुंतवणूकदारांने मोतीसन्स ज्वेलर्स कंपनीच्या शेअरमध्ये 36.3 कोटी रुपये गुंतवणूक केली आहे. मोतीसन्स ज्वेलर्स कंपनीच्या IPO मध्ये शेअरची प्राइस बँड 52 रुपये ते 55 रुपये निश्चित करण्यात आली होती.

या कंपनीने आपल्या एका IPO लॉटमध्ये 250 इक्विटी शेअर्स ठेवले आहेत. कंपनीने आपल्या IPO इश्यूमधील 50 टक्के शेअर्स पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवले होते. तर 15 टक्के वाटा गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला होता. आणि 35 टक्के वाटा किरकोळ गुंतवणूकदारासाठी राखीव ठेवण्यात आला होता.

IPO ओपनिंगच्या तिसऱ्या दिवशी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेला कोटा एकूण 119.41 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. तर NII साठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 233.16 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. QIB चा राखीव कोटा देखील शेवटच्या दिवशी 157.40 पट अधिक सबस्क्राइब झाला होता.

मोतीसन्स ज्वेलर्स कंपनीच्या IPO शेअरची लिस्टिंग 26 डिसेंबर 2023 रोजी केली जाणार आहे. 21 डिसेंबर 2023 गुंतवणूकदारांना IPO शेअर्स वाटप केले जातील. तर शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 पासून शेअर न मिळालेल्या गुंतवणुकदारांना पैसे परत केले जातील.

मोतीसन्स ज्वेलर्स कंपनीचे शेअर्स 26 डिसेंबर 2023 रोजी BSE आणि NSE इंडेक्सवर सूचीबद्ध केले जाणार आहेत. ग्रे मार्केटमध्ये मोतीसन्स ज्वेलर्स कंपनीचे शेअर्स 78 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच या कंपनीचे शेअर्स जवळपास 133 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना IPO किमतीच्या तुलनेत तब्बल 141.82 टक्के परतावा मिळेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Motisons Jewellers IPO for investment 21 December 2023.

हॅशटॅग्स

Motisons Jewellers IPO(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x