18 November 2024 9:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

RVNL Share Price | आरवीएनएल शेअर्समध्ये मजबूत खरेदी सुरू, 'या' सपोर्ट लेव्हलच्या वर टिकल्यास तेजीत वाढणार

RVNL Share Price

RVNL Share Price | आरवीएनएल कंपनीच्या शेअर्सने 2023 या वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत नफा कमावून दिला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरवीएनएल कंपनीचे शेअर 7.51 टक्क्यांच्या घसरणीसह 172.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मात्र आज या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. 12 सप्टेंबर 2023 रोजी आरवीएनएल कंपनीचे शेअर्स 199.35 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीच्या 14.72 टक्क्यांनी खाली ट्रेड करत होते.

आरवीएनएल कंपनीच्या मल्टीबॅगर स्टॉकची 52 आठवड्यांच्या नीचांक पातळी किंमत 56.15 रुपये होती. जी 202.76 टक्क्यांनी वाढून सध्याच्या किमतीवर पोहोचली आहे. आज शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी आरवीएनएल स्टॉक 0.31 टक्के वाढीसह 177.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच आलेल्या लेटेस्ट अपडेटनुसार वर्कला शिवगिरी रेल्वे स्टेशनचे काम करण्यासाठी KRDCL RVNL जॉइंट व्हेंचरने सर्वात कमी बोली सादर केली आहे. वर्कला शिवगिरी रेल्वे स्टेशन केरळ राज्यात स्थित आहे. या रेल्वे स्थानकाचे अपग्रेडेशन आणि पुनर्बांधणी करण्याचे काम आता आरवीएनएल कंपनीच्या JV ला मिळाले आहे. हा JV आरवीएनएल आणि कर्नाटक रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आला आहे. या संयुक्त उपक्रमात आरवीएनएल कंपनीचा वाटा 49 टक्के आणि KRDCL चा वाटा 51 टक्के असणार आहे. या प्रकल्पाचे एकूण मुल्य 123.37 कोटी रुपये आहे.

टेक्निकल सेटअप काउंटरवर आरवीएनएल कंपनीच्या शेअरमध्ये 170-180 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, जर हा शेअर 175 रुपयेच्या खाली आला तर यात मोठी घसरण पाहायला मिळू शकते. आरवीएनएल स्टॉकला 200 रुपये किमतीवर जाण्यापूर्वी वार्षिक उच्चांक किमतीच्या आसपास मजबूत प्रतिकार पाहायला मिळू शकतो.

तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काही दिवसांत 200 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. मात्र 190-196 रुपये किमती दरम्यान मजबूत प्रतिकार पाहायला मिळू शकतो. तज्ञांच्या मते, आरवीएनएल स्टॉकची सपोर्ट लेव्हल 170 रुपये आणि रेझिस्टन्स लेव्हल 200 रुपये किमतीवर आहे. पुढील एका महिन्यात आरवीएनएल स्टॉक 150 रुपये ते 220 रुपये किमती दरम्यान ट्रेड करु शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE 22 December 2023.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(139)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x